लातूर : प्रतिनिधी
येथील मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयाचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी औसा तालुक्यातील मौजे तोडोंळी येथे नदी किना-यावर २ हजार वृक्षारोपन केले. या उपक्रमात तोंडोळी गावचे सरपंच, प्रतिष्ठीत नागरीक, ग्रामस्थ व युवक यांचाही उत्स्फुर्त सहभाग होता.
या वृक्षारोपनांच्या कार्याबद्यल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी महाविद्यालयास गौरव पत्र देऊन महाविद्यालयाचा गौरव केला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. अजय पाटील म्हणाले की, आमचे महाविद्यालय वृक्षारोपनानंतर यापुढेही वेळोवेळी तोंडोळी गावास भेट देवून वृक्षारोपनाबरोबरच त्याचे संगोपन करण्यासाठी तोंडोळी हे गाव दत्तक घेतले असल्याचे सांगून, या गावच्या नदी किना-यांवर नंदनवन उभे करण्याचा संकल्प महाविद्यालयाने केला आहे. वृक्षारोपनाच्या या कार्याबद्यल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी महाविद्यालयाचा गौरव करण्याबरोबरच कौतुकही केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ. अजय पाटील यांच्या समवेत प्रा. डॉ. कुमार बनसोडे, प्रा. डॉ. पलमंटे माधव, प्रा. जी. एस. देशमुख उपस्थित होते.