23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरसोयाबीनवर गोगलगायीचे संकट कायम

सोयाबीनवर गोगलगायीचे संकट कायम

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
संततधार पावसामुळे सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात सोयाबीनच्या उभ्या पिकावर गोगलगायींनी हल्ला चढवला असून शेतातील पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. फवारणीनंतर ही गोगलगायींचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे उत्पादनात घट होणार असून शेतक-यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तालुक्यात यंदा सोयाबीन पिकांवर गोगलगायीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतक-यांनी हजारो रुपये खर्च करून सोयाबीनची पेरणी केली. उगवलेले सगळे सोयाबीन गोगलगायींनी फस्त केले. यावर उपाययोजना म्हणून महागडे औषध देखील फवारले.

मात्र याचा काहीच उपयोग झाला नसून आता उत्पन्नाची अपेक्षा तर दुरच, पण केलेला खर्चदेखील निघेल की नाही असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. दरम्यान तालुक्यातील शेतकरी अनेक संकटाचा सामना करत यंदा खरीपाची पेरणी केली. मात्र काही ठिकाणी अधिकच्या पावसाने तर काही ठिकाणी बी उगवले नसल्याने शेतक-यावर दुहेरी संकट आले आहे. त्यात सोयाबीनवर गोगलगायीचे संकट कायम आहे. एकीकडे पावसाने दिलेली ओढ व दुसरीकडे गोगलगायीचे संकट कायम असल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या