23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeलातूर.. तर त्या शाळा बंद करा

.. तर त्या शाळा बंद करा

एकमत ऑनलाईन

लातूर : दहापेक्षा कमी पट असलेल्या शाळा जवळच्या शाळांना जोडून बंद कराव्यात, असे आदेश अभिनव गोयल यांनी दिले आहेत. जवळच्या शाळांत जाण्यासाठी राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना वाहन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांतील शिक्षकांनी पट वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, पट न वाढल्यास या शाळाही दहा पटाच्या शाळांप्रमाणे बंद करण्यात येणार असल्याची समज गोयल यांनी दिली.

जिल्ह्यातील शंभरपेक्षा कमी पट असलेल्या शाळा सुरु करताना सुरुवातीला पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु कराव्यात व तद्नंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याविषयी जिल्हा परिषदेत हलचाली सुरु झाल्या असून तसे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले. मात्र, असे करताना शाळा शालेय व्यवस्थापन समितीच्या सहमती घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

शाळांमध्ये कोरोनाचे नियम पाळून वर्ग सुरु करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी नुकतीच बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी शंभरपेक्षा कमी पट असलेल्या शाळा शालेय व्यवस्थापन समितीच्या सहमतीने सुरु कराव्यात, असे आदेश दिले. त्यानूसार नियम पाळून काही ठिकाणी शाळा सुरु झाल्याची माहिती प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी दिली. दहापेक्षा कमी पट असलेल्या शाळा जवळच्या शाळांना जोडून बंद कराव्यात, असे आदेश अभिनव गोयल यांनी दिले आहेत.

जवळच्या शाळांत जाण्यासाठी राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना वाहन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांतील शिक्षकांनी पट वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, पट न वाढल्यास या शाळाही दहा पटाच्या शाळांप्रमाणे बंद करण्यात येणार असल्याची समज गोयल यांनी दिली.

पटसंख्येनूसार जिल्हा परिषद व खाजगी शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार सरल पोर्टलवर अपलोड करुन घ्यावेत. आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनूसार शाळांतील पद निश्चित होणार आहे. पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार अपलोड करण्यासाठी ३० सप्टेंबर ही शेवटची मुदत आहे.

एकाच विद्यार्थ्याचे आधार दोन शाळेत दिसून आल्यास विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेत त्याचे नाव ठेवून दुस-या शाळेतील नाव रद्द करावे. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी प्रत्येक गटशिक्षणाधिकारी कार्यालयात दोन मशिन असून ऑपरेटर नसल्याने त्या बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांंनी इतर केंद्रावरुन आधार नोंदणी करुन घ्यावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केली आहे.

शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण
शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. मागील आठवड्यात ९२ टक्के शिक्षक व कर्मचारी यांनी कोरोना लस घेतली आहे. आता हे प्रमाण शंभर टक्क्यांपर्यंत झाल्याची शक्यता शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी दिली. दरम्यान जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी दर गुरुवारी मेगाकॅम्पचे आयोजन केले आहे. लसीकरण न केलेले शिक्षक, कर्मचारी यांना या कॅम्पमध्ये कोरोनाची लस देण्यात येत आहे. शिक्षक व कर्मचा-यांनी लस घ्यावी, अशी सूचना अभिनव गोयल यांनी केली.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या