22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूर.. तर बोलाचा भात,बोलाची कडी आंदोलन

.. तर बोलाचा भात,बोलाची कडी आंदोलन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
नियमित कर्ज परतफे ड करणा-या शेतक-यांना राज्य सरकारने जाहीर केलेले ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान तत्काळ द्यावे, अन्यथा दि. २ ऑक्टोबर रोजी बोलचा भात, बोलाची कडी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फ त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून सरकार नियमित कर्जफे ड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देणार म्हणून शेतक-यांच्या कोपराला गूळ लावत आहे. प्रत्येक शेतक-यांच्या पदरात काहीही पडत नाही. यासाठी आम्ही मागील तीन वर्षांपासून अनेक आंदोलने केली आहेत. त्यात उोषण, केसमुंडन आदी आंदोलने केली. मात्र सरकारने त्यांची कसलीच दखल घेतली नाही. शिंदे-फडणवीस सरकारने सुद्धा प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. परंतू, आतापर्यंत अनेक तारखा निघून गेल्या आहेत. प्रोत्साहनपर अनुदान काही मिळाले नाही. त्यामुळे २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती व लालबहादुर शास्त्री यांच्या पुण्यस्मरणार्थ येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोलाचा भात अन् बोलाची कडी बनवून सरकारला आहेर पाठविण्यात येईल, असेही निवेदनात नमुद केले आहे. या निवेदनावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, नवनाथ शिंदे, राजीव कसबे, दगडू बरडे, व्यंकट मोरे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या