शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
जिल्हा बँकेचे संचालक जयेश माने यांच्या नेतृत्वाखाली प्रतापराव माने,अरंिवद पाटील,अतूल माने, शिवाजी पेठे, तुकाराम माने व सर्व शेतकरी सभासदांच्या सहकार्याने तालुक्यातील लक्कड जवळगा सोसायटी बिनविरोध काढण्यात आली आहे.सोसायटी बिनविरोध निघाल्याने शेतकरी सभासदातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून लक्कड जवळगा सोसायटीवर माने गटाचे वर्चस्व आहे. सोसायटीचे विद्यमान चेअरमन जयेश माने यांनी सर्व सभासदांना विश्वासात घेत सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी हिताची कामे केल्याने सर्व सभासदांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत लक्कड जवळगा विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध काढली आहे.
या बिनविरोध निवडीत जिल्हा बँकेचे संचालक तथा चेअरमन जयेश माने, निळकंठ मुसने, आण्णाराव जाधव, शिवाजी पेठे, सुरेश पेठे, मारूती ंिलबापुरे, लतीकाबाई माने, जिजाबाई ंिलबापुरे, देवानंद माने, तानाजी धूमाळ, अमित माडे, उद्धव सूर्यवंशी, दिलीप ंिलबापुरे यांचा नूतन संचालकामध्ये समावेश आहे. निवडीनंतर नूतन संचालकांनी सर्व शेतकरी सभासदाचे आभार मानले. सहकार मध्ये शेतकरी सभासदांचे हित लक्षात घेऊन सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक शेतकरी सभासदांचा संस्थेच्या माध्यमातून कशा प्रकारे फायदा करता येईल यावर भर देत संस्थेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे काम करणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक जयेश माने यांनी सांगितले.