29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeलातूरलातूरात लवकरच सर्वसोयीनियुक्त जम्बो कोवीड केअर सेंटर

लातूरात लवकरच सर्वसोयीनियुक्त जम्बो कोवीड केअर सेंटर

एकमत ऑनलाईन

लातूर : वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लातूरात लवकरच जम्बो कोवीड केअर सेंटर उभारण्यात येईल. लातूर जिल्ह्यातील ऑक्सिजनचा पूरवठा आता सुरळीत झाला आहे. आगामी काळातही तो नियमीत होत राहील चिता करुन नये, रेमेडीसीवीर इंजेक्शन पूरवठा वाढवीला आहे. आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. इतर औषधे व व्यवस्थाचेही नियोजन करण्यात आले आहे, असे सागून डॉक्टर मंडळीनी रूग्णांची चांगली काळजी घेऊन जनतेला दिलासा दयावा असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. २२ एप्रिल रोजी दुपारी लातूर जिल्ह्यातील सर्व वरीष्ठ अधिकारी, आयएमएचे पदाधिकारी, शासकीय तसेच खाजगी कोवीड-१९ डेलीकेटेड रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर्स यांच्याशी झुम व्हिसीव्दारे संवाद साधून कोरोना बाधित रूग्णावरील उपचार आणि हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपयायोजनांचा आढावा घेतला या प्रसंगी ते बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी रुग्णांची वाढती संख्या, ऑक्सिजन, रेमेडीसीवीर इंजेक्शन तुटवडा प्रसारमाध्यमे तसेच समाजमाध्यमातून येणा-या बातम्या, ग्रामिण भागात ठिकठीकाणी उभारण्यात आलेले कोवीड सेंटर बेडची उपलब्धता, मनुष्यबळाची टंचाई, मनुष्यबळ निवासाची व्यवस्था, आरोग्य कर्मचा-यांना वीमा संरक्षण आदी बाबीवर विस्तृत चर्चा झाली.

त्यांनतर बोलतांना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागात व्यवस्था उभारत असतांना लातूर शहरामधील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन शहरातही एक जम्बो हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या बेडची संख्या वाढणार आहे. संपूर्ण देशातच ऑक्सिजन आणि रेमेडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभुमिवर लातूर शहरासाठी या गोष्टींचा पूरवठा नियमीत होईल याची दक्षता घेतली आहे. डॉक्टर मंडळीनीही आजारसंहितेचे पालन करून ऑक्सिजन आणि औषधांचा वापर करावा. ऑक्सिजन निर्मीतीसाठी खाजगी डॉक्टरांनी पूढाकार घ्यावा, त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. वेंिन्टलेटरही आवश्यकते प्रमाणे पूरवला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी
दिले.

सर्व रुग्णालयांनी तातडीने इलेक्ट्रीकल ऑडीट करून घ्यावे, शासकीय आणि खाजगी रुग्णालयाची व्हेंिन्टलेटरची संख्या वाढवावी, हेल्पलाईनचे काम अधिक प्रभावीपणे करावे, ऑक्सिजनचा वापर काटकसरीने करावा, रेमेडीसीवीर इंजेक्शनचा पूरवठा वाढला आहे वापरा बाबत आचारसंहिता पाळावी, खाजगी रुग्णालयांना हॉटेलची सलग्नता करावी, कोवीड केअर रुग्णालया बाहेरच्या गर्दीवर नियंत्रण आणावे,खाजगी रूग्णालयांनी ऑक्सिजन निर्मीती प्लांट उभारावेत, रूग्णांची माहिती भरण्यासाठी एक खिडकी योजना अधिक सुलभ राबवावी, वैदयकीय महाविद्यालयात पोस्ट कोवीड ओपीडी सुरु करावीत, सर्वांच्या सहभागातुन लसीकरणाला गती द्यावी, खाजगी रुग्णालयात उपचार घेणा-या रूग्णांना शासकीय योजनेत समावीष्ट करण्याचा प्रयत्न करु, कोवीड केअर रूग्णालयात सेवा देणा-या कर्मचा-यांना वीमा संरक्षण देणे बाबत पाठपूरावा करु आदी सुचना व आश्वासने या बैठकी दरम्यान पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या आहेत.

या झुम व्हिसीव्दारेआयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय ढगे, डॉ. हरीदास यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, सचिव डॉ. हनुमंत किणीकर, डॉ. अजय जाधव, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. डी. एन. चिंते, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. अशोक पोतदार, डॉ. अभय कदम, डॉ. चांँद पटेल, डॉ. अशोक गानू, डॉ. संदीप कवठाळे, डॉ. चेतन सारडा, डॉ. दीपक गुगळे, डॉ. रमेश भराटे, डॉ. विश्रांत भारती, डॉ. मेहूल राठोड, डॉ. पुनपाळे, डॉ. येणाले, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. सोपान जठाळ, डॉ. जमादार, डॉ. राजेश इंद्राळे, डॉ. संजय वारद, डॉ. मंत्री, डॉ. सूर्यकांत निसाले, डॉ. विमल दोसे, डॉ. रामेश्वरी अलाहाबादे. डॉ. रवी इरपतगिरे, डॉ.गणपत सोमवंशी, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. अशोक नळेगावकर, डॉ.ज्योती सूळ, डॉ. अनिल राठी, डॉ. आरती झंवर तसेच कोवीड उपचार करीत असलेल्या रुग्णालयाचे डॉक्टर यांनी सुचना मांडून त्याच्या अंमलबजावनी संदर्भाने चर्चा केली.

पीपीई किट उघड्यावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या