26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरबीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरणी करा

बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरणी करा

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील पोखरा योजनेअंतर्गंत येणा-या गावातील शेतक-यांनी बीबीएफ – रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी केल्यास त्यांना एकरी ४०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी बीबीएफ पद्धतीने जास्तीत जास्त शेतक-यानी पेरणी करावी,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एल.एम. खताळ यांनी केली. सततच्या पिकांमुळे जमीनीची पोत खराब झाला असून त्यात पारंपारिक पेरणीमुळे सोयाबीनची उत्पादकता कमी झाली आहे. त्यामुळे उत्पन्न कमी निघत असल्याने शेतक-यांनी सोयाबीन पीक फेरपालट करावे, व योग्य व्यवस्थापन केल्यास पिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.

दरम्यान बीबीएफ पेरणीमुळे आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन्न मिळते,पावसात खंड पडल्यास वरंब्यावर ओलावा टिकून राहून पिकाला पाण्याचा ताण पडत नाही, पाऊस जास्त झाल्यास या सरी मधून अतिरक्ति पाणी बाहेर पडते, मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते, किडरोग प्रमाण कमी होते,सोयाबीन बियाणे कमी लागते,पाण्याची बचत, उत्पन्नामध्ये हमखास वाढ, पिकाची आंतरमशागत,औषध फवारणी सोपे जाते व गरज पडल्यास स्प्रिंकलरद्वारे संरक्षित पाणी देण्यासाठी ही पेरणी पद्धत कायदेशीर ठरत असल्याने बीबीएफ पेरणी पद्धत शेतक-यासाठी फायदेशीर ठरणारे आहे.

शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक असून बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरणी काळात कृषी विभाग प्रत्यक्ष शेतक-यांच्या बांधावर शेतक-यांंना मार्गदर्शन देखील करण्यात येणार असून
तालुक्यातील शेतक-यांनी बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी,असे आवाहन तालुका
कृषी अधिकारी एल.एम. खताळ यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या