26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यात पेरणीची लगबग सुरू

शिरूर अनंतपाळ तालुक्यात पेरणीची लगबग सुरू

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : तालुक्यात खरीप पेरणीची लगबग सुरु झाली असून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे.मात्र जूनचा अर्धा महिना संपला असला तरी पेरणीसाठी म्हणावा तसा पाऊस पडला नसल्याने शेतकरीचिंतीत झाले असून आता पेरणीसाठी शेतक-याना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

हवामान खात्याने यावर्षी पावसाचे वेळेत आगमन होईल व चांगला पाऊस होऊन वेळेवर पेरण्या होतील, असे भाकीत वर्तविले मात्र जूनमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी अद्याप पेरणी योग्य पाऊस पडला नसल्याने शेतक-यांचीचिंता वाढली आहे. दरम्यान गेल्या दोन तीन वर्षापासून कोरोनाचे संकट व त्यात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे खरीप पिके मातीमोल झाली तरीही शेतकरी राजा न डगमगता शेती मशागत पुर्ण करून तडजोड करीत बि- बियाणे व खत उपलब्ध घरून पुन्हा खरीप पेरणीसाठी तयार झाला. परंतू जून महिना अर्धा संपला असला तरी आणखीन दमदार पाऊस झाला नाही. परिणामी जून महिन्यात पेरणी होण्याची चिन्हे धूसर दिसू लागल्यानेचिंतेत वाढ झाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या