25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यात ७८ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

जळकोट तालुक्यात ७८ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यात जून अखेरीस ७८ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, असे असले तरी जळकोट तालुक्यात यावर्षी एकदाच पेरण्या झालेल्या नाहीत. टप्प्याटप्प्याने पेरण्या पूर्ण झाल्या आहेत . यामुळे कुठे पिके चांगली तरारली आहेत . तर कुठे पिके उगवली नाहीत. जळकोट तालुक्यात पावसाच्या असमान वितरणामुळे पेरण्या व्यवस्थित झालेल्या नाहीत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी दिली .

जळकोट तालुक्यात ज्वारी ५८० हेक्टर, तूर ३१५० हेक्टर, मुग ५०५ हेक्टर, उडीद ४०० हेक्टर , सोयाबीन १४९६५ हेक्टर, कापूस ११६० हेक्टर, ऊस १७०० हेक्टर, अशा एकूण २७ हजार ७४८ हेक्टर क्षेत्रापैकी २२४५९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जळकोट तालुक्यात यावर्षी शेतक-यांनी तुरीचे पीक कमी प्रमाणात घेतले आहे तर कापूस या पिकाची लागवड ३०० हेक्­टरने वाढली आहे तर उसाचे क्षेत्रही दुपटीने वाढले आहे. जळकोट तालुक्यात जळकोट मंडळांमध्ये सुरुवातीला चांगला पाऊस झाला यामुळे जळकोट तसेच वांजरवाडा परिसरामध्ये पेरण्या लवकर सुरू झाल्या मात्र घोनसी मंडळांमध्ये खूप उशिरा पाऊस झाला. यामुळे या परिसरातील पेरण्याही उशिराने झाल्या. पेरण्या झाल्यानंतर पाऊस सध्या योग्य पडत आहे यामुळे पिकांची उगवण ब-यापैकी होत असल्याचे दिसून येत आहे.

जळकोट तालुक्यातील वडगाव, चेरा, वांजरवाडा, होकरना, बेळ सांगवी, उमरदरा, चाटेवाडी , स्वर्गा, केकत स्ािंदगी, विराळ, धामणगाव, हावरगा जिरगा डोमगाव, शेलदरा, जगळपूर , ढोरसांगवी , मंगरूळ, बोरगाव, लाळी बुद्रुक, लाळी खुर्द, एवरी, सोनवळा, करंजी, धनगरवाडी, कोनाळी डोंगर, डोंगरगाव, शिवाजीनगर तांडा, पाटोदा खुर्द, पाटोदा बुद्रुक, कोळनूर, जंगमवाडी, कुणकी. अतनूर, हळदवाढवणा, रावणकोळा, बालाजी तांडा, देवनगर तांडा, रामचंद्र तांडा, आतनूर तांडा, गव्हाण, मेवापूर, शिवाजीनगर तांडा , वाघमारे तांडा, डोंगरेवाडी तांडा , मरसांगवी,फकरू तांडा, चतुरा तांडा, पोमातांडा, तर घोनसी पंचायत समिती गणांमध्ये एकुर्का खुर्द, तिरुका, सुल्लाळी, भवानीनगरतांडा, मेघातांडा, रावजीतांडा, थावरु तांडा, गुत्ती, रामपूरतांडा , धर्मातांडा, अग्रवालतांडा, रुपलातांडा, घोणसी, धोंडवाडी, खंबाळवाडी, घोणसीतांडा,आदी गावात ऐंशी टक्केच्या जवळपास पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या