22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरहिरव्या शेंगा वाळू लागल्याने सोयाबीनचे पीक धोक्यात

हिरव्या शेंगा वाळू लागल्याने सोयाबीनचे पीक धोक्यात

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : पीक हिरवेगार दिसत असले तरी लागलेल्या शेंगा वाळून जात असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरीचिंतातूर झाले आहेत. उत्पादनात घट होणार असून प्रशासनाने पिकांचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी शेतक-यातून केली जात आहे. परिसरात खरीप लागवडी क्षेत्रात सर्वाधिक सोयाबीन लागवडी क्षेत्र आहे. शेतक-यांची सर्व आर्थिक मदार सोयाबीन पिकावर अवलंबून आहे.

या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे उत्पन्न चांगले मिळेल अशी आशा शेतक-यांना होती.मात्र या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीनच्या मुळ्या कुजल्या असून त्यामुळे झाडावरच कोवळ्या शेंगा वाळत आहेत. सध्या या परिसरातील सोयाबीन पिकांना फुलोरा लागला असून बहुतांश पीके शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. शेंगा अचानक वाळून जात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.शेतात सोयाबीनचे पीक हिरवेगार दिसत असले तरी शेंगा मात्र वाळून जात आहेत. त्यामुळे उत्पादन तरी कसे मिळणार असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यामुळे परिसरातील शेतक-यांना कृषी विभागाकडून तातडीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेंगा वाळलेल्या पिकांची पाहणी व पंचनामे करुन पीक विम्याची रक्कम तातडीने शेतक-यांंना देण्यात यावी अशी मागणी निळकंठ मुसने यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या