21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरजिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा

जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात गेल्या दोन आठवडयात संततधार पाऊस झाला होता. त्यामुळे खरीपांच्या खोळंबलेल्या पेरण्या वेग येऊन त्या आता अंतिम टप्यात आल्या आहेत. जिल्हयात आजपर्यंत ४९७.५० मि.मी. पाऊस झाला आज पर्यंत ५ लाख ८२ हजार २०७ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा ४ लाख ८५ हजार ८६२ हेक्टवर पेरा झाला आहे.

जिल्हयात सरासरी ७९१.६० मिलीमिटर पाऊस पडतो. पावसाची सरासरी पाहता आजपर्यंत ४९७.५० मिलीमिटर पाऊस झाला आहे. या पावसाच्या जोरावर शेतक-यांनी चाढयावर मूठ धरली. लातूर जिल्हयात ६ लाख ३६ हजार ४० हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. जिल्हयात कमी-जास्त स्वारूपात पाऊस पडत आहे. या पावसाच्या आधारवर ५ लाख ८२ हजार २०७ हेक्टरवर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा ४ लाख ८५ हजार ८६२ हेक्टवर झाला आहे. त्या खालोखाल तुरीचा ६८ हजार ८१७ हेक्टरवर, मूगाचा ६ हजार ७१ हेक्टरवर, उडीदाचा ४ हजार १० हेक्टरवर, साळीचा १७२ हेक्टरवर, ज्वारीचा ६ हजार ३८७ हेक्टरवर, १६५ हेक्टरवर बाजरी, मकाचा २ हजार ४८६ हेक्टरवर, तीळ ३०४ हेक्टरवर, भुईमूग २९८ हेक्टरवर, कारळ १८९ हेक्टरवर, तर १५ हेक्टवर सुर्यफुलाचा पेरा झाला आहे. तसेच ६ हजार १९१ हेक्टरवर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.

जिल्ह्यात पिकांना पोषक असा पाऊस पडत असून आजपर्यंत सरासरी ४९७.५ मि.मी. पावस झाला आहे. यात लातूर तालुक्यात ४९१.८ मि.मी., औसा तालुक्यात ४०२.६ मि.मी., अहमदपूर तालुक्यात ५७७.७ मि.मी., निलंगा तालुक्यात ४१८.६ मि.मी, उदगीर तालुक्यात ५७९.५ मि.मी, चाकूर तालुक्यात ५५०.८ मि.मी, रेणापूर तालुक्यात ४४४.० मि.मी, देवणी तालुक्यात ५००.१ मि.मी, शिरुर अनंतपाळ तालुक्यात ५२८.९ मि.मी, जळकोट तालुक्यात ६५७.८ मि.मी पाऊस झाला आहे.

सोयाबीन पिकावर परिणाम
लातूर जिल्हयातील शेतक-यांनी ५ लाख ८२ हजार २०७ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या केल्या आहेत. सततच्या पावसामुळे कांही ठिकाणी सोयाबीन पिवळे पडत आहे. तसेच पिकावर शंखी गोगलगाईचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या