26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरसोयाबीनचा दरात घसरण सुरूच

सोयाबीनचा दरात घसरण सुरूच

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
नविन सोयाबीन बाजारात येण्याच्यापूर्वीच लातूरच्या आडत बाजार पेठेत सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण होताना दिसून येत आहे. आडत बाजारात सोयाबीनचा दर ५ हजार ४५४ रूपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली घसरला आहे. गेल्या दोन महिण्यात सोयाबीनच्या दरात जवळपास १ हजार ३०० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. नविन सोयाबीन आडत बाजारात येण्यासाठी आणखी एक ते दीड महिण्याचा आवधी आसतानाच सोयाबीनच्या दरात सतत घसरण होताना दिसून येत आहे. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी सोयाबनीचा दर प्रति क्विंटल १० हजाराच्यावर जाईल, अशी अपेक्षा अनेक शेतक-यांना व व्यापा-यांनाही होती. त्यामुळे अनेक मोठया शेतक-यांनी व व्यापा-यांनी अजूनही सोयाबीन जपून ठेवले आहे.

मात्र सोयाबीनचा दर वाढण्याची ऐवजी तो यावर्षी सतत घसरतांना पहायला मिळत आहे. लातूर आडत बाजारात दि. २४ फेबु्रवारी रोजी ७ हजार ४६० रूपया पर्यंत पोहचला होता. तो मे अखेर ७ हजार रूपये पर्यंत घसरला. तर २ जून रोजी आडत बाजारात ७ हजार १४७ क्ंिवटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधीक ६ हजार ७८२ रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर दि. ३ सप्टेंबर रोजी ८ हजार ५९८ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधिक ५ हजार ४५४ रूपये दर मिळाला आहे. गेल्या दोन महिण्यात सोयाबीनच्या दरात घसरण पहायला मिळत आहे.

जिल्हयात सरासरी ७९१.६० मिलीमिटर पाऊस पडतो. पावसाची सरासरी पाहता आजपर्यंत ५८३.५ मिलीमिटर पाऊस झाला आहे. या वर्षी या पावसाच्या आधारवर ५ लाख ८२ हजार २०७ हेक्टरवर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा ४ लाख ८५ हजार ८६२ हेक्टवर झाला आहे. त्या खालोखाल तुरीचा ६८ हजार ८१७ हेक्टरवर, मूगाचा ६ हजार ७१ हेक्टरवर, उडीदाचा ४ हजार १० हेक्टरवर, साळीचा १७२ हेक्टरवर, ज्वारीचा ६ हजार ३८७ हेक्टरवर, १६५ हेक्टरवर बाजरी, मकाचा २ हजार ४८६ हेक्टरवर, तीळ ३०४ हेक्टरवर, भुईमूग २९८ हेक्टरवर, कारळ १८९ हेक्टरवर, तर १५ हेक्टवर सुर्यफुलाचा पेरा झाला आहे. मात्र यावर्षी खरीप हंगामातील पिकांवर शंखी गोगलगायींचा परिणाम दिसून येत आहे. तसेच मोजॅक सारख्या रोगाचाही शेतक-यांना सामना करावा लगत आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतक-यांतून वर्तवली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या