24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरसोयाबीनच्या कमाल दरात १५१ रुपयांनी घसरण

सोयाबीनच्या कमाल दरात १५१ रुपयांनी घसरण

एकमत ऑनलाईन

लातूर : पारदर्शक आणि चोख व्यवहारासाठी सर्वाेदुर सुप्रसिद्ध असलेल्या लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीनला ७ हजार २१ रुपये कलाम दर होता. शनिवारी कमाल दर ६ हजार ८७० रुपये झाला. एकाच दिवसात सोयाबीनच्या कमाल दरात १५१ रुपयांची घसरण झाली. सोयाबीनला सर्वसाधारण दर ६ हजार ७५० आहेत तर हरभ-याला सर्वसाधारण दर ४ हजार ६०० रुपये मिळाला.

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत अतिश्य चोख आणि पारदर्शक व्यवहार केले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार विश्वासार् राहिलेला आहे. त्यामूळे हजारों शेतकरी बाजार समितीत शेत माल घेऊन येतात. लातूर जिल्हा तसेच जिल्ह्याच्या परिसरातील व आंध्रप्रदेश, कर्नाटक सीमा भागातूनही शेतकरी लातूरच्या बाजार समितीत शेतमाल घेऊन येतात. लातूर बाजार समितीत शनिवार दि. ११ जुन रोजी गुळ ६३८ क्विंटल, गहू ३९१ क्विंटल, ज्वारी रब्बी ९६ क्विंटल, ज्वारी पिवळी २० क्विंटल, हरभरा २८२७ क्विंटल, तूर १३६८ क्विंटल, मुग ६७ क्विंटल, एरंडी ६ क्विंटल, करडी ६५ क्विंटल, सोयाबीन ५०८२ क्विंटल तर ७० क्विंटल चिंचोक्याची आवक झाली.

गुळाला ३१७० रुपयांचा सर्वसाधारण दर तर गहू २१००, रब्बी ज्वारी २३५०, पिवळी ज्वारी ४०००, हरभरा ४६००, ६१००, मुग ५८००, एरंडी ६३००, करडी ५१५०, सोयाबीन ६७५० तर चिंचोक्याला १४०० रुपये सर्वसाधारण दर मिळाला. रब्बी हंमामात जिल्ह्यात सर्वाधिक हरभ-याचा पेरा होता. त्यामुळे पावसाळा सुरु झाला तरी आवक होतच आहे. आगामी काळात आवक मध्यम राहिल, असे व्यापा-यांचे म्हणणे आहे. सध्या खरीपाची कामे पूर्ण झाली आहेत. शेतकरी सध्या खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांची जुळवाजुळव करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या