22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरसोयाबीन टोबण पद्धत ठरतेय फायदेशीर

सोयाबीन टोबण पद्धत ठरतेय फायदेशीर

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
कृषी विभागाने सोयाबीनचा वाढता पेरा लक्षात घेऊन अधिक उतारा यावा म्हणून वाफ्यावर टोबण करण्याचा प्रचार व प्रसार केला.त्यामुळे तालुक्यात पहल्यिांदाच सुमारे दोनशे हेक्टरवर टोबण पद्धतीने सोयाबीनची लागवड झाली आहे. संततधार पावसात ही पाण्याचा निचरा झाल्याने सध्या टोबण केलेले सोयाबीन शेंगानी लगडले असून त्यातून उत्पादनात वाढ होणार असल्याने सोयाबीन टोबण पद्धत शेतक-यासाठी फायदेशीर ठरत आहे.

संततधार पावसात ही पाण्याचा निचरा झाल्याने टोबण केलेले सोयाबीन इतर सोयाबीन पेक्षा सरस ठरल्याने टोबण पद्धतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पिकविणारा तालुका अशी ओळख असलेल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात २८ हजार ६०० हेक्टर पैकी सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्रांवर शेतक-यानी सोयाबीनची लागवड केली आहे.पारंपारिक पद्धतीने सोयाबीन लागवडीकडे लोकांचा कल असला तरी काही शेतकरी टोबणकिंवा बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड केली आहे. कमी खर्चात दुप्पट उत्पन्नाची हमी असल्याने यांपुढे टोबण पद्धतीने सोयाबीन लागवडीत वाढ होणार आहे. कमी आकाराच्या स-या करून त्यात सोयाबीन हातानेकिंवा मशीनच्या सह्याने टोबून लागवड केल्याने अधिक च्या पावसाचे पाणी वाफ्यात साठून सरीवरील सोयाबीनला त्याचा परिणाम झाला नाही.त्यात दोन झाडात अंतर असल्यामुळे खेळती हवा असते त्यामुळे रानाला वापसा लवकर येते त्यामुळे वाढीला मोठे अवसान मिळते आहे, त्यामुळे पारंपारिक सोयाबीनपेक्षा टोबण केलेले सोयाबीन दमदार आल्याने टोबण पद्धत फायदेशीर ठरली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या