28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeलातूरसोयाबीनला बसतोय दोन ते तीन हजारांचा फटका

सोयाबीनला बसतोय दोन ते तीन हजारांचा फटका

एकमत ऑनलाईन

लातूर : सोयाबीनचे हब असलेल्या लातूर जिल्ह्यात यंदाही सोयाबीनचा सर्वाधिक पेरा राहिला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने पेरणीपासून ते काढणीपर्यंत सोयाबीनची नासाडी झाली. नैसर्गीक संकटे पार करीत जे हातात पडले ते बाजारात आणले जात असताना सोयाबीनला गतवर्षीच्या तूलनेत क्विंटलमागे दोन ते तीन हजाराचा फटका बसत आहे. महागाई प्रचंड वाढत असताना शेतमालाला मात्र भाव मिळत नसल्याने संकटात सापडलेल्या शेतक-यांना आणखी एक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

लातूरच्या उच्च्तम कृषी उत्पन्न आजार समितीच्या आडत बाजारात नव्या सोयाबीनचे आगमन होत आहे. दिवसाला १६ ते १७ हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक होत असताना भाव मात्र ५ हजार रुपयांच्या पुढे सरकत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. गतवर्षी ७ ते ८ हजारांचा पल्ला गाठलेल्या सोयाबीनला आाणखी भाववाढ मिळेल, या अपेक्षेने घरात ठेवलेले सोयाबीन अजूनही घरीच आहे. नवे सोयाबीन बाजारात आल्यानंतरही भाव मात्र स्थिर असल्याचे सध्याचे चित्र आहे. दि. १ नोव्हेंबर रोजी लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनची आवक १६ हजार ३२९ क्विंटल एवढी झाली. सोयाबीनच्या तूलनेत तूर, मुग आणि उडीद या पिकांच्या भावात चढ-उतार नेहमीसारखाच सुरु आहे. शेतक-यांमध्ये आता रब्बीची तयारी करण्याची लगबग सुरु झाल्यामुळे आर्थिक अडचणीतून जावे लागत आहे.

रब्बीची पेरणी तोंडावर असल्यामुळे शेतकरी आहे त्या भावातच सोयाबीनची विक्री करताना दिसत आहेत. त्यातच दिवाळीसाठी माहेरी आलेल्या मुलीला सासरी पाठविण्यासाठी नवे कपडे खरेदी करावे लागतात म्हणून शेतक-यांनी भाव नसतानाही सोयाबीन बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. बाजार समितीच्या आडत बाजारात दि. २८ ऑक्टोबर रोजी सोयाबीनची आवक ८ हजार ५०० क्विंटल होते तर दि. ३१ ऑक्टोबर रोजी हीच आवक १७ हजार २२४ क्विंटल तर दि. १ नोव्हेंबर रोजी सोयाबीनची आवक १६ हजार ३२९ क्विंटलवर गेली. आजचा सोयाबीनचा भाव पाहिला तर ७ ते ८ हजारांवरुन ५ हजारांवर येऊन ठेपला आहे. मंगळवारी सोयाबीनचा कमाल भाव ५२९९, किमान ४७३० तर सर्वसाधारण भाव ५००० रुपये प्रति क्विंटल होता.

तूरीची आवक घटली भाव जास्त
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात दि. १ नोव्हेंबर रोजी तूरीची आवक केवळ ६३३ क्विंटल होती. तूरीचा कमाल भाव ७९००, किमान ६३०० तर सर्वसाधारण भाव ७४०० प्रतिक्विंटल होता. गव्हाची आवक २७७ क्विंटल होती. त्याचा कमाल ३०५०, किमान २८८५ तर सर्वसाधारण २९७०, रब्बी ज्वारीची आवक २१३ क्विंटल, किमान भाव ४०००, किमान ३६००, सर्वसाधारण ३८००, हरभ-याची आवक २९७ क्विंटल, कमाल भाव४८५०, किमान ३८१२, सर्वसाधारण ४५५०, उडीदाची आवक ६७० क्विंटल, कमाल भाव ७६५१, किमान ५१००, सर्वसाधरण ७३२०, करडीची आवक ४० क्विंटल, कमाल भाव ५२६०, किमान ४८०० तर सर्वसाधारण भाव ५००० रुपये प्रतिक्विंटल होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या