26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeलातूरसात ऑक्सिजन प्लांट्स उभरणीला गती

सात ऑक्सिजन प्लांट्स उभरणीला गती

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरातील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालयासह जिल्ह्यातील उदगीर, औसा, निलंगा, अहमदपूर, मुरुड या सात ठिकाणी ऑक्सिजन प्लाट्स उभारणीचे काम वेगाने सुरुर आहे. येत्या ४५ दिवसांत या आठही ऑक्सिजन प्लाट्स उभारणीचे काम पूण होईल. त्यामुळे क्सिजनच्याबाबतीत लातूर जिल्हा स्वयंपूर्ण होणार आहे.

लातूर जिल्ह्यात गत वर्षी साधारणत: फेबु्रवारी २०१९ मध्ये कोरोनाच्या दुस-या लाटेत कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने जिल्ह्यातील शासकीय व खाजगी कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची कमतरता भासली. गतवर्षी ऑक्सिजनचा पुरवठा पाहिजे तसा झाला नाही. त्यामुळे अनेक कोविड रुग्णांना अडचणी आल्या. खरे तर अशी परिस्थितीत केवळ लातूर जिल्ह्यातच होती असे नव्हे तर संपुर्ण राज्यात त्याकाळी ऑक्सिजनची कमतरता होती. राज्यात उद्भवलेल्या या बिकट परिस्थितीमुळे राज्य सरकारने राज्यभर ऑक्सिजन प्लाट्स उभारणीला प्राधान्यक्रम दिला. या उपक्रमात अनेक सहकारी साखर कारखाने, संस्थांनी सहभाग घेत ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी केली.

लातूर शहरातील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, लेबर कॉलनीतील स्त्री रुग्णालयास जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा, मुरुड या सात ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्स उभारणीस राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख मंजूरी दिली. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, उदगीर, औसा, निलंगा हे पाच ऑक्सिजन प्लांट्स जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तर मुरुड व अहमदपूर येथील ऑक्सिजन प्लांट्स सीएसआयआर फंडातून उभे केले जाणार आहे. या सातही ऑक्सिजन प्लांट्सच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.

गतवर्षी ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऑक्सिजन बेड मिळवणे म्हणजे एकप्रकारे दिव्य कर्म केल्यासारखीच परिस्थिती होती. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत आव्हानात्म होती. या कालावधीत जिल्ह्यात एका दिवसांत किमान एक हजारपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची संख्या असायची. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला होता. परिणामी सर्व व्यवहार बंद झाले होते. आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी लातूर जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे.

पाच प्लांट्सची वर्क ऑर्डर दिली
विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, उदगीर, औसा, निलंगा या पाच ऑक्सिजन प्लांट्सच्या कामाची वर्क ऑर्डर दिलेली आहे. मुरुड व अहमदपूर येथील ऑक्सिजन प्लांट्सची कामे अंतीम टप्प्यात असून लवकरच या दोन ऑक्सिजन प्लांट्सचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली.

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा गोळीबार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या