21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरपाणीपुरवठा, स्वच्छतेला येणार वेग

पाणीपुरवठा, स्वच्छतेला येणार वेग

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी गेल्या वर्षभरात घरपट्टी व पाणी पट्टी वसुलीत आघाडी घेतली आहे. या ग्रामपंचायतींच्या आराखड्यातील पाणी पुरवठा व स्वच्छतेची कामे मार्गी लागण्यासाठी शासनाकडून ग्रामपंचायतींना बंधीतचा १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा २५ कोटी ३९ लाख ८५ हजार ७८१ रुपयांचा दुसरा हप्त मंजूर झाला आहे. त्यामुळे गावातील पाणी पुरवठ्याची कामे, स्वच्छतेची कामे गतीमान होणार आहेत.

लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेसाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातंर्गत जिल्ह्यास २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीचा ३१ कोटी ६५ लाख ४ हजार ९९९ रुपयांचा दुसरा हप्ता जमा झाला आहे. यात ७८६ ग्रापंचायतींना ८० टक्के म्हणजेच लोकसंख्येनुसार २५ कोटी ३९ लाख ८५ हजार ७८१ रुपये व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला १०-१० टक्के (३ कोटी १२ लाख ५९ हजार ६०९ रुपये प्रत्येकी लोकसंख्या व क्षेत्रफळ नुसार) निधी प्राप्त झाला आहे.

या आर्थिक वर्षात १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातंर्गत वितरीत निधीतून पंचायतराज संस्थांनी ग्रामपंचायत विकास आराखडयानुसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी लागणार आहे. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या निधीतून ग्रामपंचायतींना विकास आराखड्यानुसार गावातील स्वच्छता आणि हागणदारीमुक्त गावांची स्थिती कायम ठेवण्यासाठी पायाभूत सेवांवर काम करावे लागणार आहे. तसेच पेयजल पाणी पुरवठा, जल पुनर्भरण, पावसाच्या पाण्याची साठवण या बाबीवर एकूण निधीच्या ५० टक्के खर्च करावा लागणार आहे. त्या गावात जर या सुविधा झाल्या असतील तरच हा निधी इतर कामावर खर्च करता येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या