32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home लातूर सार्वजनिक स्थळी थुंकणे व मास्क न वापरणा-यांवर; १०० ते ५०० रुपये दंड...

सार्वजनिक स्थळी थुंकणे व मास्क न वापरणा-यांवर; १०० ते ५०० रुपये दंड व फौजदारी गुन्हे दाखल करा

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना अहवालानुसार ५६व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३३ तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे २३ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ३३ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या ५४१ अहवालापैकी ४६५ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३ हजार ८९ एवढी झाली असून यातील २१ हजार ९६८ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ३१८ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ११बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ५९२ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी १, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण २१, हदगाव कोविड रुग्णालय २, किनवट कोविड रुग्णालय २, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १ भोकर तालुक्यांतर्गत १ खाजगी रुग्णालय ५ असे एकूण 33 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९५.१४ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २७, हदगाव तालुक्यात ३, उमरखेड १, भोकर १, लोहा १ असे एकुण 33 बाधित आढळले. अ‍ॅटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र १७, किनवट तालुक्यात २, परभणी १, देगलूर १, माहूर २ असे एकूण २३बाधित आढळले. जिल्ह्यात ३१८बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २४ जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड३२, किनवट कोविड रुग्णालयात १२, हदगाव कोविड रुग्णालय ३, देगलूर कोविड रुग्णालय ३, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 171, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ३४, खाजगी रुग्णालय ३९ आहेत. शनिवार २० फेब्रुवारी रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १६० जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ७२एवढी आहे. नरुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-३१८अतिगंभीर प्रकृती असलेले-११ रुग्ण आहेत.

कोरोनाची लस सर्वांनी घ्यावी:आयुक्त डॉ.लहाने
कोरोनाची लस सुरक्षित असून मनात कोणतीही भिती न बाळगता अधिकारी,कर्मचारी व नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी केले आहे. सध्या इतर जिल्हयात कोरोनाचे रूग्ण वाढले असले तरी नांदेडमधील परिस्थिती नियंत्रणात आहे.यासाठी प्रशासनाकडून खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.असे असले तरीही नागरिकांनी सर्तक राहून घराबाहेर पडावे,योग्य ते उपाय करावेत.मास्क वापरावा,सॅनिटॉयझरचा वापर करावा.सुरक्षित अंतर पाळावे.प्रादुर्भाव होऊ नये याकरिता कोरोनाची लस आवश्यक आहे.मी ही लस घेतली असून महापालिकेतील इतर अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोनाची लस शक्य तेवढ्या लवकर घेण्यासाठी आव्हान आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी केले आहे तर मनपातील अधिकारी कुमार कुलकर्णी यांनीही हैदरबाग येथील रुग्णालयात कोरोनाची लस घेतली.

‘हसरे तारे’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या