34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूरलातूर शहरात स्वयंफूर्तीने संचारबंदी

लातूर शहरात स्वयंफूर्तीने संचारबंदी

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दि. २७ व २८ फेब्रुवारी असे दोन दिवस लातूर जिल्ह्यातील जनतेचे स्वेच्छेने जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन केो होते. या आवाहनास लातूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद दिला होतो. दुस-या दिवशी म्हणजे रविवारी त्यापेक्षाही अधिक प्रतिसाद जनता कर्फ्यूला मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळून लातूर शहरात तर स्वयंफूर्तीने नागरिकांनी कडकडीत बंद पाळल्याने शहरात संचारबंदीसारखीच स्थिती होती.

लातूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला होता. परंतु, १५ फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. नोव्हेंबर २०२० आधी जिल्ह्यात दररोज ३४ ते ४० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असत मात्र १५ फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाबाधितांचा आकडा ८५ ते ९५ पर्यंत गेल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनांनूसार जिल्ह्यात २७ व २८ फेब्रुवारी स्वेच्छेने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानूसार लातूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी शनिवारी जनता कर्फ्यूला अभुतपूर्व प्रतिसाद दिला होता. तसाच प्रतिसाद रविवारीही मिळाला. त्यामुळे लातूर शहरात अघोषीत संचारबंदीसारखी स्थिती होती.

लातूर शहरातील व्यापाारी, उद्योजक, व्यवसायिक, सामान्य नागरिकांनी गेल्या दहा-अकरा महिन्यांत कोरोनाची स्थिती अनुभवलेली आहे. त्यामुळे शनिवारी जनता कर्फ्यू जसा प्रतिसाद दिला त्यापेक्षा अधिक प्रतिसाद रविवारी दिला. शहरातील व्यापा-यांनी आपली दुकाने उघडलीच नाहीत. रविवार असल्यामुळे शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना सुटीच होती. त्यामुळे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर दिसून आले नाहीत. भाजीपाला, किराणा, भूसारमालाची दुकानेही बंदच होती. शहराची मुख्य बाजारपेठ असलेली गंज गोलाई, मेन रोड, हनुमान चौक, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, औसा रोड, बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, मार्केट यार्ड, सुभाष चौक छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वामी विवेकानंद चौक, गरुड चौक, महात्मा बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक, पाचनंबर चौक हा सर्व परिसरत कडकडीत बंद होता.

ना पोलीस, ना मनपाचे कर्मचारी…
जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी गंज गोलाई, हनुमान चौक, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, रेणापूर नाका परिसरात पोलीस बंदोबस्तासह महानगरपालिकेचे कर्मचारी विनामास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई केली. रविवारी नेमके याविरुद्ध चित्र पहावयास मिळाले. नागरिक घराबाहेर पडलेच नाहीत. अगदीच नाईलाज असलेला एखाद-दुसरा माणुस रस्त्यावर दिसत होता. त्यामुळे रस्त्यावर ना पोलीस होते ना महापालिकेचे कर्मचारी.

नांदेड जिल्ह्यात कोरोना वाढला ; ९० जण पॉझिटीव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या