27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरमूकबधिर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

मूकबधिर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
रोटरी क्लब लातूरच्यावतीने मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांसह चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा आनंद मूकबधिर विद्यार्थ्यांनी घेतला असून, त्यामुळे त्यांच्या कौशल्याला चालना मिळाली आहे. रोटरी क्लब लातूरच्या वतीने अ‍ॅड विजयगोपाल अग्रवाल मूकबधिर विद्यालयात क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धा घेण्यात आली. यात मूकबधिर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात रितेश माने, अमोल सूर्यवंशी, अभिषेक देशपांडे, कृष्णा धोत्रे, प्रवीण शिरगिरे, विश्वजीत देशमुख, नवनाथ पुरी, अमित वाघमारे, अमोल सूर्यवंशी, सद्दिकी हत्तद, अश्विन पाटील यांनी यश मिळविले.

विजेत्यांना रोटरी क्लबचे अध्यक्ष नानिक जोधवानी, सचिव अ‍ॅड. जांबुवंतराव सोनकवडे, प्रकल्प संचालक संजय निलेगावकर यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महेंद्र जोशी, राजकुमार गिरवलकर, उमाकांत पेन्सलवार, राघवेंद्र इटकर, विक्रमसिंग जाधव, नागनाथ कलवले, पी. व्ही. कुलकर्णी, मुख्याध्यापक गौतम जोगदंड यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी प्रशांत कुलकर्णी, महेश पाळणे, नंदकुमार थडकर, नामदेव भालेकर, अविनाश रामढवे, सचिन बिरादार, जयलाल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या