30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरअप्पा गणेश मंडळातर्फे सॅनिटायझरची फवारणी

अप्पा गणेश मंडळातर्फे सॅनिटायझरची फवारणी

एकमत ऑनलाईन

लातूर : शहराच्या गाव भागातील चौदाघर मठ परिसरातील अप्पा गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग क्रमांक ८ मध्ये सॅनिटायझर फवारण्यात आले.

या उपक्रमाचा प्रारंभ चौदाघर मठाचे ट्रस्टी राजकुमार झिपरे, धुळाप्पा जयशेट्टे, चंद्रकांत बावगे, संजय दाणे, बाबुअप्पा पावशेरे, संगमेश्वर मठपती, रमाकांत बावगे यांच्या हस्ते करण्यात आला. चौदाघर मठ, आझाद चौक, झिंगणप्पा गल्ली, सिद्धार्थ कॉलनी, पोस्ट ऑफिस, औसा हनुमान, खंडोबागल्ली, पोचम्मागल्ली, राचट्टेगल्ली, मोमीनवाडा आदी ठिकाणी सॅनिटायझर फवारण्यात आले. यासाठी सहकार्य करणा-या महानगरपालिकेच्या कर्मचा-यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला.

या उपक्रमात अप्पा गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रसाद बिडवे, सचिव रतन चंदनगिरे, शिवम मठपती, नागेश बावगे, सुमित चोळखणे, विष्णु झिपरे, गणेश सिद्धेश्वरे, गोविंद झिपरे ओंकार स्वामी, शैलेश स्वामी, नागेश स्वामी, विजय मठपती, बालाजी झिपरे, समीत स्वामी बाभळगावकर, सचिन पावशेरे, विनय पावशेरे, वैभव चोळखणे, मंदार प्रयाग, महेश
चोळखणे, उमेश स्वामी, राहूल पुदाले, आकाश चंदनगिरे, शुभम स्वामी, योगेश सिद्धेश्वरे, प्रतिष सिद्धेश्वरे, ओम तांबोळकर, प्रधुम्न सिद्धेश्वरे, आरिफ शेख, विजय फेसगाळे आदी सहभागी झाले होते.

लातूर महापालिका करणार बाप्पाचे विसर्जन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या