27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरनीट परीक्षेत श्री त्रिपुरा महाविद्यालयाने राखली सर्वोत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा

नीट परीक्षेत श्री त्रिपुरा महाविद्यालयाने राखली सर्वोत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
एनटीएद्वारे घेण्यात आलेल्या नीट-२०२२ परीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्नच्या श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने घवघवीत यश मिळवून लातूरमधील यशाची परंपरा अबाधित ठेवली आहे. श्री त्रिपुरा महाविद्यालयातून एकूण ४२६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यापैकी दि. ८ सप्टेंबरपर्यंत हाती लागलेल्या निकालाप्रमाणे १४ विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. यामध्ये आदित्य ईश्वर सेनानी याने एकूण ६८० गुण घेऊन ऑल इंडिया रँक ८३१ मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, प्रतीक्षा प्रकाश देसाई हिने ६५५ गुण, भरत पटेल ६३० गुण घेऊन अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. ३९+ विद्यार्थ्यांनी ५५० पेक्षा अधिक गुण संपादित केले, तर ७२ विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण घेऊन यश संपादन केले. ६०० पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.

आदित्य सेनानी (६८०), प्रतीक्षा देसाई (६५५), भरत पटेल (६३०), तन्मय ढोले (६२३), संदीप कदम (६२२), झिक्रा कासीम (६२१), अदिती चव्हाण (६१६), शेख निशात (६१३), मोहम्मद असगर सय्यद (६११), भाविक रोहिले (६११), करण काळे (६१०), फझल पठाण (६०६), सिद्धाराम गवळी (६०५), पुष्कराज देठे (६०५) यांनी राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उत्कृष्ठ यश संपादन केले आहे.

श्री त्रिपुरा महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एकत्रित प्रयत्नांची पराकाष्टा करून हे यश संपादन केलेले आहे.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव, संस्थेच्या सचिव तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या सुलक्षणा केवळराम, संस्थेच्या कोषाध्यक्ष प्रेरणा होनराव, संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. ओंकार होनराव, उपप्राचार्य राजकुमार केदासे, प्रा. मनोहर कबाडे, प्रा. राकेश चौधरी, प्रा. रामशंकर यादव, प्रा. सुनील कुमार वर्मा, प्रा. शैलेंद्र परिहार, प्रा. विकास कुमार सोनी, प्रा. सतिष पाटील, प्रा. दीपक होनराव, प्रा. श्रीराम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे या दैदीप्यमान यश प्राप्तीसाठी कौतुक केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या