23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरगॅसच्या वाहनाला एसटी बसची धडक; मोठा अनर्थ टळला

गॅसच्या वाहनाला एसटी बसची धडक; मोठा अनर्थ टळला

एकमत ऑनलाईन

लातूर : शहरातील राजीव गांधी चौकात थांबेलेल्या गॅसच्या वाहनाला एसटी बसने मागुन जोराची धडक दिली. यामुळे गॅसच्या वाहनातील गॅस सिलिंडर रस्त्यावर विखुरले गेले़ अत्यंत गजबलेल्या व मोठी रहदारी असलेल्या राजीव गांधी चौकात रविवारी दुपारी ही -हदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली़ दैव बलवत्तर म्हणतात त्याप्रमाणे मोठा अनर्थ टळला.

एमएच-२० बी़ एल़ १३३५ या क्रमांकाची निलंगा डेपोची एस.टी. बस औरंगाबादहून निलंगा येथे चालली होती. ही बस राजीव गांधी चौकात आली. त्यावेळी स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर वाहून नेणारे एमएच- २४ ए़ यु़ ५५१७ या क्रमांकाचा टपटम याच चौकातून वळण घेत होते.

त्यादरम्यान एस़ टी़ बसचा ब्रेक लागला नसल्याने एस.टी. बस टमटमवर जाऊन धडकली. या अपघातात गॅस सिलिंडर वाहून नेणारा टमटम पलटी झाला. टमटममधील गॅस सिलिंडर रस्त्यावर विखुरले़ एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत एसटी बस रस्ता दुभाजकावर चढवली. त्यामुळे समोरुन येणा-या वाहनांचा धडक लागली नाही. अत्यंत गजबजलेल्या व मोठी रहदारी असलेल्या राजीव गांधी चौकात हा अपघात झाला मात्र मोठी अनर्थ टळला.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या