24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeलातूरराज्य सामायिक प्रवेश परीक्षा आजपासून

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा आजपासून

एकमत ऑनलाईन

लातूर : महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्यामार्फत एमएचसीईटी परिक्षा आज दि. १ ते ९ ऑक्टोंबर २०२० या कालावधीत होणार आहे. पीसीबी ग्रुप दि. १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत व दि. १२ ते २० ऑक्टोबर या कालावधीत पीसीएम ग्रुपसाठी सादर परिक्षा होणार आहेत.

लातूर जिल्ह्यात सदर परिक्षेसाठी एकूण १२ परिक्षा केंद्र अंतिम केले असून यातील ९ परिक्षा केंद्र लातूर शहरात, १ औसा तालूक्यात, २ परीक्षा केंद्र निलंगा शहरात आहेत. शासनाने लातूर जिल्ह्यासाठी जिल्हा संकर्प अधिकारी म्हणून पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. के. एम. बकवाड लातूर यांची नियुक्ती केलेली आहे. ही परिक्षा दोन सत्रात असून प्रथमसत्र वेळ ७.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत व दुसरे सत्र दुपारी १२.३० ते सायंकाळी ६.४५ वाजेपर्यंत राहणार आहे.

सकाळच्या सत्रासाठी विद्यार्थ्यांना सकाळी ७ वाजल्यापासून प्रवेश दिला जाणार आहे. व दुपारच्या सत्रासाठी १२.३० वाजेपासून प्रवेश दिला जाणार आहे. तसेच सकाळच्या सत्रासाठी ८.४५ नंतर व दुपारच्या सत्रासाठी २.१५ नंतर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा कक्षामध्ये विद्यार्थ्यांना मास्क, हातमोजे, सॉनिटायझर, पारदर्शक पाणी बाटली, बलॅक/बिल्यू पेन प्रवेश पत्र ओळखपत्र व इतर परिक्षा संदर्भातील आवश्यक कागदपत्रे सोबत आणने आवश्यक आहे. तसेच कोव्हीड-१९ च्या संदर्भात सर्व परिक्षा केंद्रावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परिक्षेला येण्यापूर्वी प्रेवश पत्रावरील सर्व सुचनांचे व्यवस्थीत वाचन करुन त्यानूसार परिक्षा केंद्रावर उपस्थित रहावे.

एस. टी. महामंडळातर्फे परिक्षेच्या वेळा पत्रकानूसार विभाग नियंत्रक यांनी प्रत्येक तालूका निहाय बसेसची व्यवस्था केलेली आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित आगार व्यवस्थापकाकडे नोंदणी करण्यासाठी विभाग नियंत्रक लातूर यांनी सुचित केले आहे. परिक्षेसाठी उपकेंदावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परिक्षा कालावधीत परिक्षा केंदावरील विजपुरवठा खंडीत होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचे भारनियमन होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपणी यांना सूचना दिलेल्य आहेत.

त्याचप्रमाणे परीक्षा कालावधीत टेलीफोन व इंटरनेट सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी बीएसएनएल लातूर यांना कळविण्यात आले आहे. परिक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अडचणी असल्यास जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. के. एन. बकवाड मोबाईल क्र. ८२०८३२४४१० यांना व सहाय्यक संपर्क अधिकारी संदीप केंद्रे मो. क्र. ९७६५८८७०००यांना संपर्क साधावा. तसेच एस. टी. महामंडळाच्या बसेसासाठी विचारणा करावयाची असल्यास विभाग नियंत्रक अभय देशमुख विभाग यांचेशी संपर्क साधावा त्यांचा मो. क्र. ९१६८८४५१११ असा आहे.

जिल्ह्यातील एमएटीसीईटी परीक्षा केंद्र असे
नेटीजन डिजीटल झोन, लातूर , टि. सी.कोड- १३२८६,
नेटीझन्स आयटी सोल्युशन लातूर, टि. सी. कोड- ३६३३,
स्वामी विवेकानंद इंन्सटूयट ऑफ पॉलिटेक्नीक, लातूर, टि. सी.कोड- ३३९८,
ओम साई इंन्फोटीच, लातूर टि. सी. कोड-९३९६,
दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स, लातूर टि. सी. कोड- ३६५४,
व्हिडीएफ स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँन्ड टेक्नालॉजी, लातूर टि. सी .कोड- ३०६७,
कॉलेज ऑफ कॉमप्युटर सायंन्स अँन्ड इनफोरमेशन टेक्नॉलॉजी कॉकसीट, लातूर टि. सी. कोड- ९४८१,
संदिपानी टेक्नीकल कॅपस, लातूर टि. सी.कोड- २६६२,
एमडीए इंन्सटयूट ऑफ पॉलिटेक्नीक कोळपा, टि. सी.कोड- ३६८२,
राजीव गांधी इंन्सटयूट ऑफ पॉलिटेक्नीक ता. औसा, हासेगाव, टि. सी. कोड- ४८९६,
महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, निलंगा टि. सी. कोड-४८९५,
महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा टि. सी. कोड-४८९९.

परीक्षार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यास त्याची स्वतंत्रपणे परीक्षा घेणार
विद्यार्थ्यांची पल्स ऑक्सिमीटरने तपासणी तसेच तापमान मोजणे व कोव्हीड-१९ च्या अनुषंगाने इतर आवश्यक तपासणी करुन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच परीक्षेच्या दिवशी एखादा विद्यार्थ्यो कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यास किंवा कोव्हीडची लक्षणे आढळल्यास अशा विद्यार्थ्यांची शेवटच्या दिवशी म्हणजे पीसीबी ग्रुपसाठी दि.९ ऑक्टोबर रोजी दुस-या सत्रात व पीसीएम ग्रुपपसाठी दि. २० ऑक्टोबर रोजी दुस-या सत्रात त्यांची परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात येईल व याबाबत संबधीत उमेदवारास योग्य त्या सूचना देण्यात येतील.

नागपूरची अवस्था मुंबई-पुण्यासारखी होईल : आमदार कृष्णा खोपडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या