34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरराज्य शासन आपत्तीग्रस्थांच्या पाठीशी

राज्य शासन आपत्तीग्रस्थांच्या पाठीशी

एकमत ऑनलाईन

औसा : लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दि. १८ आँक्टोंबर रोजी पाहणी केली. उमरगा तालुक्यातील कवठा येथे शेतक-यांशी संवाद साधला राज्य शासन आपल्या पाठीशी आहे; काळजी करु नका, असा धीर दिला.

माजी केंद्रिय कृषीमंत्री शरदचंद्र पवार, राज्याचे वैदयकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रविवारी दुपारी उमरगा तालुक्यातील कवठा येथील शेतावर जाऊन शिवार पाहणी केली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतक-यांच्या शेतावर प्रत्यक्ष खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतक-यांशी संवाद सांधला त्यांच्या व्यथा व अडचण समजून घेतली. शेतक-यांनी काळजी करु नये शासन आपल्या सोबत आहे, असे सांगून त्यांना धिर दिला.

कवठा येथील भेटीनंतर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी माजी केंद्रिय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या सोबतच औसा तालुक्यातील उजणी येथे भेट देऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतक-यांनी पाण्यात सडून नुकसान झालेले सोयाबीन तसेच तुरीचे पिक त्यांच्या निर्दशनास आणून दिले. हे नुकसान पाहिल्यानंतर यासर्व नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश शासनाने प्रशासनाला दिले आहेत. शेतक-यांनी काळजी करु नये त्­यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री देशमुख यांनी दिले. यावेळी शेतकरी शिष्टमंडळाने दिलेले निवेदणे माजी केंद्रिय कृषीमंत्री शरदचंद्र पवार व लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी स्विकारली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष पवार, नरेंद्र पाटील, रशिद शेख , बबन भोसले यांनीही निवेदन दिले.

राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी मंत्री बसवराज पाटील, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार राहुल मोटे, उस्मानाबाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, बसवराज पाटील नागराळकर, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, नारायण लोखंडे, किरण रवींद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, शिवसेनेचे संतोष सोमवंशी, अफसर शेख, सुभाष पवार, दत्तात्रय कोळपे, अमरसिंह भोसले, श्रीकांत सूर्यवंशी, नरेंद्र पाटील, रशिद शेख, जावेद शेख, भरत सूर्यवंशी, गोविंद जाधव, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी यांच्यासह कृषी महसूल विभागाचे संबंधित अधिकारी सोबत होते.

काळजी न करण्याचे आवाहन
अतिवृष्टीने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांच्या सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नूकसान झाले आहे. निसर्गाने साथ दिल्याने शेतक-याने मोठ्या हिंमतीने खरीपाची पेरणी केली होती. पिकेही चांगली बहरली होती, परंतु, अचानक अतिवृष्टी झाल्याने हातातोंडाशी आलेला शेतक-यांचा घास जलसंकटाने हिरावून घेतला आहे. शेतक-यांचें अतोनात नुकसान झाले आहे. अशा कठीस परिस्थितीत राज्य सरकरा शेतक-यांसोबत आहे, त्यामुळे शेतक-यांनी काळजी करु नये, असे आवाहन यावेळी खासदार शरदचंद्र पवार व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.

तेरणाकाठच्या नुकसानीची घेतली माहीती
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे औसा तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख व इतर मंत्री महोदयांनी केली. त्यांनी तेरणा नदीवरील पुलावर थांबून पुरामुळे नदीकाठच्या शेतक-यांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी शेतक-यांनी नुकसानीची माहिती खासदार पवार यांना दिली. त्यानंतर हे बेलकुंड, काजळे चिंचोली, येथे शेतक-यांशी संवाद साधला. नुकसानीची संपुर्ण माहिती घेण्यात आल्याने मदतीसंदर्भात शेतक-यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

महामारीचा प्रकोप डॉक्टरांचे प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या