24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeलातूरराज्य सरकार कायम शेतकऱ्यांसोबत

राज्य सरकार कायम शेतकऱ्यांसोबत

एकमत ऑनलाईन

लातूर : महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी हिताचे सरकार आहे. ते कायम शेतकऱ्यांसोबत आहे. राज्य सरकार संवेदनशील असल्यानेच अतिवृष्टी आणि शेतात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ केले जात आहेत. नुकसानग्रस्तांना तातडीने मदतसुद्धा केली जाईल, असा विश्वास आहे, अशा शब्दांत आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

रेणापूर तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्प 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नुकतेच पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाची पाहणी करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार श्री. धिरज देशमुख यांनी गुरुवारी जलपूजन केले. त्यानंतर अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.

आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून अतिवृष्टी, पूर, कोरोना, दुष्काळ, वादळं अशी वेगवेगळी संकटे येत गेली. पण, राज्य सरकार खंबीर आणि तितकेच संवेदनशील आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना तातडीने मदत केली जात आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचेही शासनाने आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली मिळेल.

रेणा मध्यम प्रकल्प यापूर्वी 2016 मध्ये शंभर टक्के भरला होता. त्यानंतर प्रकल्प क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नाही. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात हा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांतील पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. प्रकल्पाखालील क्षेत्रात पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यापासून शेतकरी वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी. प्रत्यक्ष पाहणी अहवाल सादर करावा, प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष ठेवावे, अशा सूचनाही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

भंडारवाडी, कामखेडा व परिसरातील ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना आमदार श्री. धिरज देशमुख यांनी दिल्या. याप्रसंगी माजी आमदार श्री. त्र्यंबक भिसे, ट्वेन्टीवन कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. विजय देशमुख, उपविभागीय अधिकारी श्री. अविनाश कांबळे, रेणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. रोहित जगताप, तहसीलदार श्री. राहूल पाटील, रेणा कारखान्याचे चेअरमन श्री. सर्जेराव मोरे, रेणापूर तालुका काँग्रसचे अध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, यशवंतराव पाटील, लालासाहेब चव्हाण, अनंतराव देशमुख, प्रवीण पाटील, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, उप कार्यकारी अभियंता हिबारे, शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी, काँग्रेस राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रमेश सूर्यवंशी, रेणापूर संगांयो समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील, शाखा अभियंता नेहा पवार, स्थापत्य अभियंता सहाय्यक एस. पी. डब्बे, एस. बी. पोतदार, वैभव जाधव आदी उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या