25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeलातूरसंततधार पावसाने राज्यमार्गाची दैना

संततधार पावसाने राज्यमार्गाची दैना

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर-कळंब या दुपदरी २३६ नंबरच्या राज्यमार्गाचे काम गेल्या गेल्या दोन वर्षापासून मंद गतीने सुरू होते. मात्र या राज्यमार्गाचे काम गेल्या सहा महिण्यापासून ठप्प झाले आहे. गेल्या तीन दिवसापासून लातूर तालुक्यात संततधार पाऊस पडत असल्यामुळे अर्धवट काम झालेल्या या राज्यमार्गावरून ये-जा करणा-या प्रवाशांना व वाहन चालकांना मात्र पावसाळयात प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.

लातूर-कळंब हा ६०.४८५ कि.मी. चा २३६ नंबरचा राज्यमार्ग आहे. या रस्त्यावरून दिवसाला हजारो वाहनांची ये-जा असते. सदर राज्यमार्गाचे रूंदीकरण व नुतनीकरण करण्याचे काम १८ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू झाले आहे. या राज्यमार्गावरील लातूर जिल्हयातील लातूर ते कानडी बोरगाव हा ३१ कि.मी. चा राज्यमार्ग नुतनीकरणासाठी व रूंदीकरणासाठी औरंगाबाद येथील ऐशवर्या कन्स्ट्रक्शन या कंपनीने रस्ता दुतर्फा खोदला. कानडी बोरगाव ते जवळा, काटगाव पर्यंत ब-यापैकी एकतर्फी व दुतर्फा डांबरीकरणाचे काम झाले आहे. तर त्यापुढे लातूर पर्यंत रस्ता पूर्णत: खोदून ठेवला आहे.

लातूर तालुक्यात सोमवारपासून संततधार पाऊस पडत आहे. नुतनीकरणाच्या नावाखाली लातूर-कळंब राज्यमार्ग खोदून ठेवला आहे. सतत पडणा-या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. तसेच रस्ता खोदल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. रस्त्यावर कांही ठिकाणी चारचाकी वाहने जावून उंचवटे तयार झाले आहेत. सततच्या पावसाने रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी स्वरांना वाहने चालवणे जिकीरीचे होत आहे. तर कांही वाहने घसरतही आहेत. संततधार पावसाने राज्यमार्गाची दैना केली आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी राज्यमार्ग कुचकामी
लातूर तालुक्यातील लातूर-कळंब रस्त्याचे काम गेल्या सहा महिण्यापासून थांबले आहे. ग्रामीण भागातील नागरीकांना विविध कामा निमित्त लातूरला यावे लागते. सध्या पडत असलेल्या संततधार पावसामुळे रस्ता पूर्णत: निसरडा होऊन दुचाकी घसरून पडण्याच्या घटना वाढत आहेत. ये-जा करणा-या नागरीकांची अर्धवट रत्याच्या कामामुळे आडचण होत आहे. तसेच कोरोना सारख्या आजारी रूग्णांना व नियमित उपचारासाठी येणा-या रूगणांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक असते. या रूग्णांना राज्यमार्गावरून घेऊन जाणा-या वाहनांना अनेक बाबींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या राज्यमार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरीकातून होत आहे.

विष्णुपुरी प्रकल्पाच्या तीन दरवाज्यातुन पाण्याचा विसर्ग सुरूच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या