24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरश्रीराम विद्यालयाच्या प्रयोगाची राज्यस्तरावर निवड

श्रीराम विद्यालयाच्या प्रयोगाची राज्यस्तरावर निवड

एकमत ऑनलाईन

रेणापूर : लातुर येथील वर्ल्ड पीस स्कूलमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. २० व २१ रोजी आयोजीत करण्यात आले होते.यामध्ये रेणापूर येथील श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी धैर्यशिल देविदास कातळे यांनी प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या उज्वल यशाबदल संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात चि. धैर्यशील कातळे यानी विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्व सुविधा युक्तघर. निर्माण करणे हा उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञानावर अधारीत पर्यावरणस्रेही निवास-अर्थात स्मार्ट होम हा प्रयोग सादर केला . यात जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला असून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यास विज्ञान शिक्षक रामरेड्डी कोतवाड ,शिवाजी तोकले ,अनिल कुटवाड ,प्रयोगशाळा सहाय्यक शिवकुमार भातांब्रे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष देविदासराव कुटवाड, सचिव. अ‍ॅड पंडीतराव उगीले, प्राचार्य सतिष गोडभरले, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतिष मोरे, पर्यवेक्षक सिध्देश्वर मामडगे, प्रा.जूबेरखाँ पठाण यांची उपस्थिती होती.

गुणवंत विद्यार्थी , पालक देविदासराव कातळे ,सौ .दिपाली कातळे ,बालीकाबाई कातळे व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला जिल्हास्तरीय चित्रकला स्पधेतील प्रथम धैर्यशील कातळे, मार्गदर्शक आर.ए. बारस्कर. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक विजेती धनश्री संजय बरीदे मार्गदर्शक अमृतेश्वर स्वामी,’सुनिता वेल्हाळे यांचा सत्कार करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या