23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरतणावमुक्तीसाठी व्यसनापासून दूर राहावे

तणावमुक्तीसाठी व्यसनापासून दूर राहावे

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : तणावमुक्त जीवन जगण्यासाठी तरुणांन व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन अहमदपूर येथील कलाध्यापक महादेव खळुरे यांनी केले. जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या औचित्यांने नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन दि.३१ मे रोजी सकाळी ७. ४५ वाजता ‘तणावमुक्त जीवन जगण्यासाठी युवकांनी व्यसनापासून दूर रहावे’ या विषयावर युवकांसाठी संवाद साधला आहे.

युवकांना तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन हे शालेय व महाविद्यालयीन जीवनातच जडत असते.अनेक जाहिरातीतून मुलांना व्यसनाकडे आकर्षित करुन घेतले जाते. साधी सुपारीपासून ते गुटख्यापर्यंतचा प्रवास हे शालेय जीवनात सुरु होतो. हे व्यसन लागू नये म्हणून शासन स्तरावरून अनेक प्रयत्न केले जातात.तंबाखू मुक्तशाळा अभियान अंतर्गत शालेयa स्तरावर नऊ निकष पूर्ण करून ‘तंबाखू मुक्त शाळा’ घोषित केले जाते. तरीही शाळेच्या परिसराच्या बाहेर बरेचसे पान शाँप, छोटे व्यवसाय केंद्र या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री होताना दिसून येते. १३ ते २१ या वयोगटात विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन जडले तर ते व्यसन सुटत नाही. समाजातील जेष्ठ व्यक्ती, विविध सामाजिक संघटना अशा युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.शाळेच्या वेळात विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचे लक्ष असते पण शाळाव्यतिरिक्त अन्य वेळी पालकांनी आपला पाल्य काय करतो, कुणासोबत फिरतो, काय खातो,याकडे लक्ष ठेवले तर मुले व्यसनापासून दूर राहु शकतात.

राज्यात सन २०१२ पासून गुटखा विक्रीवर बंदी आहे. तरीही राज्यात सर्रासपणे गुटखा विक्री होताना दिसून येते. गुटख्यामुळे अनेक मुले विविध आजारांनी ग्रासलेले आहेत. तंबाखू मध्ये असलेले हानिकारक रसायने हे शरीरासाठी घातक आहेत. निकोटीन हा रसायन परत-परत व्यसन करण्यास परावृत्त करीत असतो. यामुळे मुले हेकेखोर बनतात, चिडचिड करतात, ताणतणाव वाढतो व आईवडिलांना त्रास देत असताना पहावयास मिळते. सुजान युवकांनी मित्र ,नातेवाईक, शेजारी,समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न केल्यास नक्कीच देश व्यसनमुक्त देश बनल्याशिवाय राहणार नाही. अशा गंभीर व राष्ट्रीय समस्येवर महादेव खळुरे यांनी आकाशवाणी नांदेड येथून युवकांसाठी संवाद साधला.
फोटो २

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या