24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरसंभाजी सेनेचा हनुमान चौक येथे रास्ता रोको

संभाजी सेनेचा हनुमान चौक येथे रास्ता रोको

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून एकरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी. या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले. वर्षानुवर्षे शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे व सरकारच्या उदासिनतेमुळे उध्दवस्त होत आहे. कधी लष्कर आळी तर कधी कोरोनासारखी महामारी, यातून शेतकरी सावर तो ना सावरतो तोच शंखी गोगलगाईने शेतातील पिके उध्दवस्त करुन टाकल्यामुळे शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे सर्व पिकांना पाणी लागल्या सर्व पिके नष्ठ होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून शेतकरी मोठया आर्थीक संकटात सापडला आहे.

या संदर्भाने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन शेतक-यांना एकरी ५० हजार रूपयांची मदत करण्याची विनंती केली होती. अद्यापपर्यंत सरकारने कोणतीही मदत जाहीर केली नाही. म्हणुन दि. १० ऑगस्ट रोजी हनुमान चौक, लातूर येथे संभाजी सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या मागणीचा तात्काळ विचार करून मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना मदत जाहिर करावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संभाजी सेनेचे अध्यक्ष सुधाकर माने, संभाजी सेनेचे नेते धर्मराज पवार, जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, विलास लंगर, बबन राजे, योगेश देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष मदन बोडके, माधव मुडकर, सचिव बालाजी घोडके, सिध्दाजी गरड, लखन साबळे, रतन माने, प्रसाद पवार, अमोल कांदे, संतोष शिंदे, बालाजी गायकवाड, केशव कदम, नागनाथ कोपनबोयणे, सुरज कातळे, अलिम पठाण आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या