24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeलातूरफायनान्स कंपन्यांचा हप्त्यासाठीचा ससेमिरा थांबवा

फायनान्स कंपन्यांचा हप्त्यासाठीचा ससेमिरा थांबवा

एकमत ऑनलाईन

अति सामान्य महिलांची जिल्हाधिका-यांकडे धाव, कर्ज माफीची मागणी

लातूर : विविध फायनान्स कंपन्याकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता लॉकडाऊनचा कालावधी असल्याने आम्ही भरु शकत नाही़ त्यांचे प्रतिनिधी हप्त्यासाठी फोन करीत ससेमिरा लावला आहे़ तसेच वाढीव व्याजासहीत कर्ज हप्ता भरावा लागेल अशी धमकी देत आहेत तेव्हा य कंपन्यांचा वाढता ससेमिरा थांबवा, अशी येथील क्वाईलनगरातील अतिसामान्य महिलांच्यावतीने मागणी जिल्हधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जनलक्ष्मी, एकलव्य, सुर्योदय, रत्नाकर बँक, एकविकस या फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे़ कर्ज घेणाºया महिला या धुनी-भांडी धुवून उदरनिर्वाह करीत आहोत़ कोरोना या अजारामुळे ही कामेही बंद झाली आहेत़ तसेच लॉकडाऊनमुळे कामेही बंद झाली आहेत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले असताना त्यात या कपंन्याचे प्रतिनिधी फोन करुन कर्ज हप्ता भरण्यासाठी तागादा लावत आहे़ हप्ता वेळेवर न भरल्यास अतिनिक्त व्याजाने कर्ज भरावा लागेल अशी धमकी देत आहेत.

या कंपन्याचा ससेमिरा थाबवा तसेच हे कर्ज माफ करण्यात यावे,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़ या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ जोंधळे यांच्यासह अनसुया गायकवाड, लता भालेकर,भाग्यश्री भालेकर, मनिषा भालेकर, यशोधा भालेकर, क्रांती कांबळे, माया सूर्यवंशी, रेखा भालेकर, विद्या पाटील, मुन्नी राजपूत, पुजा लामतुरे, ज्योती हजारे यांच्यासह या भागातील ५५ जणांच्या स्वाक्ष-या आहेत.

Read More  बा-हाळीत भरदिवसा चोरी; रोख एक लाख लंपास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या