28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरशिंदे-फडणवीस सरकारविरोधात रस्ता रोको

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात रस्ता रोको

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : अतिवृष्टी व रोगाच्या प्रादुर्भामुळे शेतक-यांचेह्याुकसान झाले आहे. यात भरीव मदत करण्याची गरज आहे. परंतु शिंदे-फडणवीस सरकारने मात्र शेतक-यासाठी केवळ तुटपुंजी मदत जाहीर करून शेतक-यांची चेष्टाच केली असून शिंदे-फडणवीस सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले असल्याचे राष्ट्रवादीचे युवा प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सांगितले.

महाविकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ बुधवारी शहरातील बसवेश्वर चौकात रास्ता रोको आंदोलनात शेतक-यांना संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर,राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस सचिव अभय साळुंके, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष माणिकराव गायकवाड, अल्पसंख्यांक नेते प्रा.महताब शेख यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करुन नायब तहसिलदार तानाजी यादव यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. तालुक्यात अतिवृष्टी,शंखी गोगलगाय व संततधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.अशा स्थितीत शेतक-यांना भरीव मदत देण्याची गरज आहे. पण राज्य सरकार गंभीर नसल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील यांनी सांगितले.

पिकाचे आतोनात नुकसान होऊनही अनुदानातून वगळल्याने शेतक-यांत प्रचंड नाराजी असल्यामुळे सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी,असे युवा नेते अभय साळुंके यांनी संगितले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख भागवत वंगे, शिवराज धुमाळे, नगरसेवक सुधीर लखनगावे,अ‍ॅड. सुतेज माने, संतोष शिवणे,संजय बिराजदार,लक्ष्मणराव बोधले, राजकुमार पाटील, वैशंपायन जागले,अब्दुल अजीज मुल्ला, राजेंद्र साकोळे,तानाजी निडवंचे, डॉ.संजय बंडले,संतोष महाजन,गुराळे गणेश, सादात पटेल, सतीश शिवणे, ज्ञानेश्वर पाटील,निवृत्ती सुर्यवंशी, ऋत्वीक सांगवे, शैलेश वलांडे, सुचित लासूने, मुसाभाई मुजेवार,प्रतिक पारशेट्टे, शिवदास उंबरगे,अकबर तांबोळी,शम्मु पटेल, ईस्माईल पठाण,रमेश सोनवणे, योगेश बसपुरे, मैनुद्दीन शेख यांसह शेतकरी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या