रेणापूर : लातुर अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील कोळगाव तांडा तेथील राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ बी सर्व्हीस रस्ता करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी वारंवार निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्याने दि. २३ मे रोजी सकाळी ११ वा गोर सेनेच्या वतीने कोळगाव तांडा येंथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लातुर अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव तांड्यातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी, जिल्हा परिषद शाळेला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जावे लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गचा सर्व्हीस रोड मंजूर असून अध्यापही त्याचे काम झाले नाही. या रस्त्याचे काम ग्रिल कंपनीने केलेले आहे. अद्यापपर्यंत मंजुर असुनही या रोडचे काम झाले नसल्यामुळे या तांडयावरील दोन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या बाबत गोर सेनेच्या वतीने दि. ८ मार्च २०२२ रोजी तहसिलदाराकडे रोडच्या मागणीसाठी वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही अद्यापपर्यंत कार्यवाही न झाल्याने गोर सेनेच्या वतीने दि. २३ मे रोजी जिल्हाध्यक्ष बबलू जाधव यांच्या उपस्थितीत लातूर अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलन करणा-यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.या रस्ता रोको आंदोलनात प्रसिद्धीप्रमुख शरद राठोड, तालुकाध्यक्ष बाळू चव्हाण, लातूर शहर संघटक बंटी राठोड, अँड शेषेराव हाके, समाधान राठोड, सचिव परमेश्वर,ओमराज राठोड, धोंडीराम चव्हाण, आकाश राठोड, प्रदीप राठोड, विशाल राठोड, कृष्णा राठोड,संतोष राठोड,करण राठोड,प्रवीण राठोड, सचिन चव्हाण,उषाभाई राठोड, ललिताबाई राठोड, सुनीता राठोड,मीरा राठोड,धुराभाई राठोड यांच्यासह कोळगाव तांडा येथील नागरिक ग्रामस्थ महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.