34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूरनिलंगा, चाकूर, जळकोट येथे कडकडीत बंद

निलंगा, चाकूर, जळकोट येथे कडकडीत बंद

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन दिवस्यीय पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी तसेच वाापा-यांनी प्रतिसादर दिली. निलंगा, चाकूर, जळकोट येथे बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व व्यवहार बंद होते. निलंगा शहरात दि २८ फेब्रुवारी रविवार रोजी जिल्हाधिका-यानी केलेल्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन निलंगेकरांनी स्वेच्छा जनता कर्फ्यू पाळला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिका-यांनी दोन दिवस स्वेच्छा जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते.

यात निलंगा शहरातील व्यापारी महासंघाच्या वतीने शनिवारी जनता कर्फ्यूमध्ये व्यापारी व नागरिकांनी समिश्र प्रतिसाद दिला मात्र दुस-या दिवशी रविवारी जिल्हाधिका-यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी महासंघाच्या वतीने शनिवारी शहरात दवंडी देऊन आवाहन करण्यात आल्यानंतर रविवारी निलंगा शहरात सर्वच व्यापा-यांंनी व्यापार बंद ठेवून कडकडीत जनता कर्फ्यू पाळला. केवळ दवाखाने मेडिकल व पेट्रोल पंप वगळता इतर सर्व सेवा स्वच्छेने बंद ठेवून शहरातील व्यापा-यांनी व नागरिकांनी स्वेच्छा जनता कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदवला. यामुळे शहरात रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. दरम्यान जिल्हाधिका-यांनी केलेल्या दोन दिवशीय जनता कफ्युूच्या आवाहनाला तालुक्यातील औराद शहाजानी येथील व्यापारी व नागरिकांनी प्रतिसाद देत दुस-या दिवशीही रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेऊन औरादकरांनी स्वइच्छा जनता कर्फ्युत सहभाग नोंदवला.

चाकूर तालुक्यात ग्रामीण भागात एक दोन व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट पॉझीटीव आले आहेत.खबरदारी म्हणून जनतेने मास्क वापरावे, हात साबणाने धुवावे, सामाजिक अंतर ठेवावे.कोरोनांचा शिरखाव होऊ नये म्हणून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले होते. चाकूर शहरात सकाळ पासूनच मुख्य बाजारपेठतील दुकाने बंद करण्यात आली होती. शहरात फक्त जीवनावश्यक वस्तुचे दुकाने सुरू होती.रस्त्यावर शुकशुकाट होता.जनतेने कोरोनांची साखळी तोडण्यासाठी आज शंभर टक्के बंद पाळण्यात आला.

जळकोट येथे पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद दिला होता, दुस-या दिवशी रविवारीही जनता कर्फ्यू ला प्रतिसाद मिळाला, सर्व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती, शहरातील रस्त्यावर एक दोन व्यक्ती वगळता गर्दी नव्हती , रस्त्यावर मात्र वाहनांची ये-जा होती. या वाहनांची तपासणी पोलिसांमार्फत केली जात होती, जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र जनता कर्फ्यूला तेवढा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले, जळकोटचे पोलीस निरीक्षक गणेश सोडार यांनी खडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. एकंदरीत दुस-या दिवशीही जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळाला.

देवणी तालुक्यात उस्फूर्त प्रतिसाद
तालुक्यातील जनता कर्फ्यूला देवणी, वलांडी, जवळगा, बोरोळसह आदी गावातील नागरिकांनी रविवार दि.२८ फेब्रुवारी रोजी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सर्व बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवून सहभाग नोंदवला. देवणी, वलांडी येथील बाजारपेठे बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला तर रस्त्यावर रहदारीही दिवसभर बंद होती. दुस-या दिवशीही देवणी तहसीलदार सुरेश घोळवे यांनी तीन पथके नियुक्त केले होते. त्यातील नायब तहसीलदार हिसामोद्दीन शेख यांच्या निगराणीत एक पथक तहसील कार्यालयात ठेवण्यात आले होते. तर देवणी येथील बोरोळ चौक ते लासोना चौक येथे एक पथक ठेवण्यात आले होते. त्याचे प्रमुख गोंिवद भाऊराव ताटे यांच्या पथकात ५ कर्मचा-याचा समावेश होता. तर वलांडी येथे एक पथक नियुक्त करण्यात आले होते. पथकाचे प्रमुख कृषी अधिकारी वाय बी. केदासे होते. यांच्या पथकात ७ कर्मचा-यांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान देवणी तहसीलदार सुरेश घोळवे यांनी संबंधित पथकांना भेटी देऊन दिवसभराचा आढावा घेतला. दिवसभर विना मास्क फिरणा-यांंवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले. या पथकात देवणी पोलिसांनीही आपला सहभाग नोंदवला.

 

‘लाऊड स्पीकर’ने होतेय रब्बी ज्वारीची राखण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या