22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूर‘श्री’च्या आगमनाची जोरदार तयारी

‘श्री’च्या आगमनाची जोरदार तयारी

एकमत ऑनलाईन

लातूर : उद्या गणरायाचे आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वगतासाठी सर्वच गणेशभक्त जोरदार तयारीला लागले आहेत. दोन वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाची धुम असणार आहे. गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मंडप उभारणे, विद्यूत रोषणाई करणे आदी कामांत गुंतले आहेत. तर गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेला ढोलताशांचा सराव आता अंतिम टप्प्यात आला आहे. शहरात सर्वत्र उत्साहाला उधान आले आहे. यानिमित्ताने बाजारपेठेतही लगबग दिसून येत आहे.

सलग दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास निर्बंध घातलेले होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव ब-यापैकी ओसरल्याने कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सार्वजनिकरित्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. उद्या दि. ३१ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. गणरायाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यासाठी लातूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच गणेश मंडळे जोरदार तयारी करीत आहेत. गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले गणेशभक्त आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी करीत आहेत. गणेशमुर्ती, सजावट साहित्य खरेदी, मंडप उभारणी, विद्युत रोषणाई करण्यासाठी एकच धावपळ दिसून येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपती बसविण्यासाठी नागरिकांनी व बच्चे कंपनीकडून बाजारात गणेशमुर्तीची नोंदणी केली जात आहे. विविध गणेश मंडळानी मंडप उभारणीसह आरास निर्मितीच्या कामास प्रारंभ केला आहे. गणेशमुर्तीसह सवाद्य मिरवणुकांचे नियोजन करण्यात येत आहे. आकर्षक श्री मुर्तींसह भव्य मंडप, विद्यूत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पौराणिक व सद्य:स्थितीवर आधारीत आरास, देखावे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ठ्ये ठरणार आहे. त्यासाठी प्रमुख गणेश मंडळांचे कार्यकर्ते गेल्या एक महिन्यापासून तयारी करीत आहेत.

गणेशोत्सवास बुधवारपासून प्रारंभ होत असल्यामुळे सर्वत्र उत्साला उधान आले आहे. यानिमित्ताने बाजरापेठेतही लगबग वाढली आहे. गणेश मुर्ती विक्रीचे असंख्य स्टॉल्स बाजारपेठेत लागलेले आहेत. घरगुती गणेश मुर्तीसह मंडळाला लागणा-या मोठ्या मुर्त्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. देखाव्याच्या साहित्यांनी बाजार फु लला आहे. आरास, विद्युत रोषणाईच्या माळा, मखर, फुलांच्या माळा आदी शोभीवंत साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या