निलंगा : केंद्रातील भाजपशासित मोदी सरकार हे भाजपविरोधी असलेल्या राज्यातील पदाधिकारी , मंत्री यांच्या मागे आकसबुद्धीने जाणून बुजून त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग आता राज्यसभेच्या निवडणुका समोर ठेऊन सोनिया गांधी व राहूल गांधी यांना इडीचे समन्स पाठवून दबाव तंत्राचा वापर करीत आहेत. त्याचा जाहीर निषेध महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात यापुढे कायद्याने लढा देण्यासाठी दोन हजार वकिलांची टीम तयार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विधी व आरटीआय विभागाचे अध्यक्ष अॅड. रवीप्रकाश जाधव यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विधी विभागाचे अॅड. रवी प्रकाश जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी माने, राष्ट्रवादीचे नेते पंडितराव धुमाळ, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे, शिवसेना जिल्हा सहकारप्रमुख विनोद आर्य, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश रेशमे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती अजित माने, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष लाला पटेल,
निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,काँग्रेस जेष्ठ नेते अॅड नारायण सोमवंशी, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख ईश्वर पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष इस्माईल लद्दाफ, युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, शिवसेना शहर संघटक हरिभाऊ सगरे, युवासेना प्रमुख प्रशांत वांजरवाडे, युवक कार्यध्यक्ष महेश चव्हाण, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष डॉ.उमाकांत जाधव, टिपू सुलतान जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर, गणराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष रामंिलंग पटसळगे, तुराब बागवान, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष उल्हास सूर्यवंशी, बालाजी तळेगावे, दिगंबर सूर्यवंशी, संगायो सदस्य गोविंद सूर्यवंशी,प्रमोद ढेरे, अजय कांबळे, एफरोज शेख आदी उपस्थित होते.