24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरहावरगा साठवण तलावातून पाणी उपसा जोरात

हावरगा साठवण तलावातून पाणी उपसा जोरात

एकमत ऑनलाईन

जगळपूर : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील जगळपूर या गावासह अनेक गावांना पाणी पुरवठा करणा-या हावरगा साठवण तलावाने तळ गाठला आहे. तलावातून पाण्याचा बेसुमार उपसा केला जात आहे. सदरील साठवण तलावावर विद्युत मोटारीने पाणी उपसा सुरू आहे, परिणामी याच पाण्यावर अवलंबुन असलेल्या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेण्याची शक्यता आहे.

पाटबंधारे विभाग व तहसील प्रशासनाने त्वरित कारर्वाई करून बेसुमार पाण्याचा उपसा होणारा थांबवावा अशा मागणीचे निवेदन जगळपूर ग्रामपंचायतने तहसिलदार जळकोट यांना निवेदन देऊन पंधरा दिवस झाले तरी तहसिल प्रशासनाने यावर काहीच कारवाई केली नाही. जगळपूर , हावरगा, डोमगाव, येलदरा या चार गावांना याच साठवण तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र साठवण तलावावर विद्युत मोटारीने मोठ्या प्रमाणात अवैद्य उपसा सुरू केला आहे.

त्यामुळे साठवण तलावातील पाण्याची पातळी खालावली असून फक्तवीस दिवस पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा तलावात शिल्लक राहीला आहे, असाच पाणी उपसा सुरू राहीला तर जनावराना,पशुपक्षांना पाणी पिण्यासाठी शिल्लक राहणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या