26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरविद्यार्थ्यांना दोन्ही डोस होणे बंधनकारक

विद्यार्थ्यांना दोन्ही डोस होणे बंधनकारक

एकमत ऑनलाईन

लातूर : ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात ८ वी ते १२ वी वर्ग ऑफलाईन सुरु झाल्यानंतर आता २० ऑक्टोबरपासून वरिष्ठ महाविद्यालये सुरु होणार आहेत. त्याअनुषंगाने शहरातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांनी वर्ग घेण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र तत्पुर्वी विद्यार्थ्यांचे कोविड लसीचे दोन्ही डोस होणे बंधनकारक असून प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनीही लस घेणे बंधनकारक आहे.

लातूर शहरात जवळपास ११ वरिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यातील विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार ५७६ च्या जवळपास आहे. शाळा सुरु झाल्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयांत ऑफलाईन सुरु व्हावेत, यासाठी विद्यार्थ्यांची विचारणा होत होती. दरम्यान दिवाळीनंतर महाविद्यालये सुरु होतील, अशी अपेक्षा असताना राज्य शासनाने २० ऑक्टोबरपासून ५० टक्के व त्यापेक्षत्त अधिक उपस्थितीत ऑफलाईन वर्ग घेण्याच निर्णय घेतला आहे. त्यासाठी कोविड नियमांची आचारसंहिता महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना वर्गात बसायचे आहे, त्या विद्यार्थ्यांचे कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानूसार महाविद्यालयांमध्ये वर्ग सुरु करण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड, श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डोंगरगे यांनी सांगीतले. वरिष्ठ महाविद्यालयांतील ऑफलाईन सुरु होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयाय मिळत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या