30.1 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeलातूरविद्यार्थ्यांनो, नाविन्यपूर्ण संशोधनात भविष्य घडवा

विद्यार्थ्यांनो, नाविन्यपूर्ण संशोधनात भविष्य घडवा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
संशोधन करणे ही आधुनिक काळाची गरज असून प्रत्येकांनी नावीन्यपूर्ण संशोधन केले पाहिजे. उच्च शिक्षण आणि संशोधनात संशोधकांनी उंच भरारी घेतली पाहिजे. अमेरिका, चीन यासारख्या पाश्चात्य देशाच्या तुलनेत भारतीय संशोधन हे खूपच मागे आहे. त्यामुळे संशोधकांनी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर नवसृजनात्मक संशोधन करून जागतिक स्तरावर भारताचे नावलौकिक केले पाहिजे.राष्ट्राचा खरा विकास करायचा असेल आणि जगद्गुरु म्हणून पुढे यायचे असेल तर नवीनतम संशोधन पुढे आले पाहिजे. संशोधकांनी अंतर्मनात ज्या कल्पना आहेत, त्याला संधी दिली पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले.

दयानंद विज्ञान महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय आविष्कार-२०२३ चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी होते. याप्रसंगी रमेश बियाणी, सुरेश जैन, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, उपकेंद्र लातूरचे संचालक डॉ. राजेश शिंदे, संचालक डॉ. राजाराम माने, संचालक डॉ. लड्डा, डॉ. संजय पेकमवार, डॉ. कोमल गोमारे, डॉ. सरिता यन्नावार, डॉ. शैलेश पटवेकर, डॉ. जी. कृष्णा चैतन्य, डॉ. महादेव पंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. पारंपरिक गुरुकुल पद्धती आणि जगात आदर्श मानल्या गेलेल्या तक्षशिला, नालंदा विद्यापीठातला आदर्श घेतला पाहिजे, असे सांगून डॉ. बिसेन म्हणाले की, संशोधनावर जास्तीत जास्त निधी खर्च झाला पाहिजे. बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारताला वैज्ञानिक, मूल्याधिष्ठित आणि समाज उपयोगी संशोधनात संशोधक विद्यार्थ्यांनी पुढे आणले पाहिजे.

प्राचार्य डॉ. दरगड म्हणाले की, दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम, लेक्चर वर्कशॉप, पीएच.डी.कोर्स वर्क, इन्स्पायर सायन्स कॅम्प, रिफ्रेशर कोर्स,रिसर्च प्रोजेक्ट, पोस्टर प्रेझेंटेशन आदींच्या माध्यमातून सातत्याने संशोधनाला चालना दिली जाते. अशा या उद्देशातूनच विद्यापीठाच्या अंतर्गत आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. अध्यक्षीय समारोपात लाहोटी यांनी विद्यापीठस्तरीय आविष्कार- २०२३ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक येणा-या संशोधक विद्यार्थ्यास २१ हजार रुपये बक्षीस देण्याचे जाहीर करून संशोधनात विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडविले पाहिजे असे सांगितले. प्रास्ताविक डॉ. कोमल गोमारे यांनी केले. आभार डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. मेघा पंडित यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या