लातूर : प्रतिनिधी
नीट परीक्षेला कसे समोरे जावे?, पेपर सोडविण्याची पद्धत कशी असावी?, परीक्षेतील तीन तासांच्या कालावधीत कोण-कोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यावर कशा पद्धतीने मात करायची, परीक्षा काळात आहार, वेळ आणि अभ्यासाचे नियोजन याबद्दल खुद्द प्रा. शिवराज मोटेगावकर सरांच्या ‘आरसीसी’च्या टोपर्स असलेल्या आणि सध्या दिल्ली एआयआयएमएस आणि एमएएमसी मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरांनी नीट देणा-या विद्यार्थ्यांसोबत विचारमंथन करुन त्यांना परीक्षेचा मार्ग सुकर करण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले.
नीट परीक्षा ही १७ जुलै रोजी होणार आहे. अशावेळी नीट-२०२२ देणा-या विद्यार्थ्यांसाठी प्रा. मोटेगावकर सरांच्या
‘आरसीसी’ च्या वतीने टोपर्स टॉप, अनुभवाचे बोल या उपक्रमाचे लातूर आणि नांदेड येथे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी फउउचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर सर, लातूर आणि नांदेड येथील फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयाचे तज्ञ प्राध्यापक उपस्थित होते. दरम्यान, नीट-२०२२ देणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एआयआयएमएस आणि एमएएमसी मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले अनिरुद्ध डाखरे, श्रेया आरु आणि अथर्व वट्टमवार रोहन घुगे हे तसेच मुंबई येथे एमबीबीएसचा विद्यार्थी ऋ षिकेश हुगडे हे विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी उपस्थित परीक्षार्थींना आरोग्याकडे लक्ष द्या, स्वत:ची काळजी घ्या, ६ ते ७ तास झोप घ्या, वेळेचे नियोजन विषयनिहाय, झालेल्या पेपर चे अनॅलिसिस करा, ऐनवेळी अनेक अडचणी निर्माण कुठल्याही समस्या उद्भवतात त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत परीक्षा द्यावी लागेल याची पूर्वतयारी करा असे मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमामध्ये मोटेगावकर, डॉ. राजू, कुरणे, एस. एस. राव, यु. व्ही. राव, अतुल आदी तज्ज्ञ प्राद्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन प्रशांत सूर्यवंशी व कुलदीप कुलकर्णी यांनी केले. लातूर आणि नांदेड येथे सलग दोन दिवस आयोजित कार्यक्रमाला हाजरो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.