22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरविद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे

विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व ब्रिलियंट महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ सप्टेंबर रोजी महाविद्यालायच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये द्वितीय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्र. कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे स्पर्धेच्या युगामध्ये विध्यार्थ्यानी आपल्या ज्ञानाचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत करावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. पी. एन. सगर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी योग्यतो मार्ग निवडून आपले करियर बनवावे. सादरी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एकनाथ पाटील यांनी केले, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे लोकमाता चॅरिटेबल ट्रस्टचे कोषाध्यक्ष सीए दिगंबर साके. तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य महादेव ठाकूर, रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी आनंद मोहोळकर, परीक्षा प्रमुख प्रा. पूजा भोसले आदी उपस्थिती होते.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. विकास वाघमारे व प्रा. सादिया जुनेद यांनी केले. तर आभार प्रा. बळीराम मोठेराव यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. भावना सेन, प्रा. शिवेश्वर मुचाटे, प्रा. युवराज अंधोरीकर, प्रा. महादेव बरुरे, प्रा. भगवान सुरकूटे, प्रा. सुरेंद्र खपाटे, प्रा. कविता खुरपे, प्रा. सोनाली दिघे, प्रशांत तिवारी, ऋषिकेष साके, परमेश्वर लवटे, गणेश लवटे अजय सांडूर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यानी सहकार्य केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या