16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeलातूरप्रश्नपत्रिकेसाठी विद्यार्थी ताटकळले साडे तीन तास

प्रश्नपत्रिकेसाठी विद्यार्थी ताटकळले साडे तीन तास

एकमत ऑनलाईन

चाकूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून एम.कॉम व्दितीय वर्षाच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रीका वेळेत मिळत नसल्यामुळे तब्बल साडेतीन तास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ताटकळत थांबावे लागले.

कोरोनाच्या संसंर्गामुळे विद्यापीठाच्या परीक्षा घ्यायचा की नाही याबाबत अनेक दिवस चर्चा झाल्यानंतर अंतीम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. एम. कॉम व बी. एडच्या परीक्षेला गुरूवारी (दि १५) पासून घेतल्या जात आहेत. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन हे दोन्ही पर्यांय देण्यात आले आहेत. ऑफलाईनच्या माध्यमातून विद्यार्थी महाविद्यालयात येऊन परीक्षा देत आहेत. शुक्रवारी (दि १६) एम. कॉमची परीक्षा सकाळी साडे अकरा वाजता होती. परंतु विद्यापीठाकडून प्रश्नपत्रीका उपलब्ध झाली नसल्यामुळे विदयार्थ्यांना प्रश्नपत्रीकेची वाट पाहत बसावे लागले.

विद्यापीठाकडून दुपारी तीन वाजता प्रश्नपत्रीका प्राचार्यांकडे उपलब्ध झाल्यानंतर परीक्षेला सुरूवात झाली. तब्बल साडेतीन तास उशीरा परीक्षेला सुरूवात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. पहिल्या दिवशीही अडीच तास उशीराने प्रश्नपत्रीका उपलब्ध झाली होती.

बीएडच्या परीक्षेसाठीही वेळेत प्रश्नपत्रीका उपलब्ध झाल्या नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेविद्यापीठयाच्या परीक्षा विभागात पुणे येथील एका बा यंत्रणेकडून प्रश्नपत्रीका तयार करण्याचे काम केले जाते. त्यांच्याकडून वेळेत प्रश्नपत्रीका मिळाल्या नसल्यामुळे परीक्षा केंद्राला प्रश्नपत्रीका पाठविण्यासाठी विलंब होत आहे. दुस-या दिवशी कोणत्या विषयाच्या परीक्षा आहेत. त्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत की नाही याची खात्री करण्याची जबाबदारी परीक्षा विभागाची आहे परंतु त्यांच्याकडून दुर्लक्ष झाल्यामुळे याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या केंद्रावर ही परीक्षा होत असून पन्नास विद्यार्थ्यापैकी ३७ विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देत आहेत. हे विद्यार्थी ग्रामीण भागातून सकाळी दहा वाजता परीक्षा केंद्रावर हजर झाले परंतु प्रश्नपत्रीका उपलब्ध झाली नसल्यामुळे त्यांना ताटकळत परीक्षा केंद्रावर उपाशीपोटी थांबावे लागले. यात विद्यार्थींनींची संख्या सर्वांधीक आहे.

विद्यापीठाकडून वेळेत प्रश्नपत्रीका उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. एम. कÞॉम व्दितीय वर्षाच्या प्रश्नपत्रीकेत तांत्रीक अडचण आल्यामुळे प्रश्नपत्रीका महाविद्यालयाकडे वेळेत पाठविता आल्या नाहीत. डॉ. रवि सरवदे (संचालक, परीक्षा विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड) यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मनस्ताप; कुलगुरुंकडे तक्रार करणार
परीक्षा वेळेत होत नसल्याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या असून परीक्षा विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला आहे, यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कुलुगुरूकडे करणार आहे.
-अ‍ॅड. युवराज पाटील (सिनेट सदस्य स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ)

मोबाईलवर दिसते ४ जी, स्पीड मात्र २ जीची

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या