23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरनिलंगा येथील उपविभागीय पोलीस अधिका-यास बडतर्फ करा

निलंगा येथील उपविभागीय पोलीस अधिका-यास बडतर्फ करा

एकमत ऑनलाईन

निलंगा : तालुक्यातील पत्रकारांवर उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीसांकडून होत असलेले हल्ले व अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही करण्याची मागणी निलंगा तालुका पत्रकार संघाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री लातूर, विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड , जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक, उपविभागीय कार्यालय निलंगा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरण्याचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यात संचारबंदी सुरू असून जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांना ओळखपत्र सोबत बाळगून पत्रकारांनी पत्रकारिता करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख हे पदाचा गैरवापर करीत आहेत. औरादशहाजानी येथील पत्रकार दीपक थेटे यांना औरादशहाजानी येथे मारहाण केली आहे. याबाबत पत्रकार संघाची बैठक सामाजीक अंतर पालन करून गुरूवारी दि. ३० रोजी घेण्यात आली. पदाचा दुरुपयोग करणारे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्री , पालकमंत्री लातूर , तसेच नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी निलंगा यांचेमार्फत देण्यात आले. या निवेदनावर तालुक्यातील जवळपास पंचवीस पत्रकाराच्या स्वाक्ष-या आहेत. सदरील निवेदन उपविभागीय अधिका-यांना देण्यात आले.

बैठकीस निलंगा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ काळगे सचिव झटिंग म्हेत्रे ,गोविंद इंगळे, लक्ष्मण पाटील, श्रीशल्य बिराजदार, अभिमन्यू पाखरसांगवे,दिपक थेटे ,परमेश्वर शिंदे, तुकाराम सूर्यवंशी , दीपक थेटे , बालाजी थेटे, माधव पिटले,मोहन क्षीरसागर ,मिलींद कांबळे ,अमोल ढोरसिंगे,अस्लम झारेकर ,दत्ता बोंडगे,मोईज सितारी , आदी पत्रकार उपस्थीत होते

मतदारसंघातील पत्रकारांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत: निलंगेकर
या प्रकरणाविषयी माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्हिडिओ कँफ्रेसद्वारे संवाद साधत माझ्या मतदारसंघातील पत्रकारांवरील हल्ले, मारहाण खपवून घेतले जाणार नाहीत असे ते म्हणाले. सर्व पत्रकारांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन पत्रकारिता करावी व मी या गंभीर विषयी नक्कीच तात्काळ दखल घेऊन सरकार दरबारी हा प्रश्न मांडून न्याय मिळवुन देतो असा शब्द आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना दिला.

Read More  कोविड रुग्णाकडून डिपॉझिट मागणा-या रुग्णालयावर कारवाई करावी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या