22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरचाकूर तालुक्यातील दोनशे शेतक-यांनाच अनुदान

चाकूर तालुक्यातील दोनशे शेतक-यांनाच अनुदान

एकमत ऑनलाईन

चाकूर : चाकूर तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित असून केवळ दोनशे शेतक-यांंना अनुदान देण्यात आले आहे. बहुतांश शेतक-यांना अनुदान न मिळाल्याने शेतक-यांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा ४८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर असुन सुरूवातीला सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले, नंतर सोयाबीनचे पीक शंखी गोगलगायीने मोठ्या प्रमाणात फस्त केले.अनेक शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. बहुसंख्येने शेतक-यांच्या सोयाबीनचे नुकसान झाले असताना केवळ दोनशे शेतक-यांना अनुदान देण्यात आले. कसे पंचनामे झाले, कसे अहवाल शासनाला सादर केले आहेत.हा यक्षप्रश्न जाणकार शेतक-यांना पडला आहे. याबाबत कृषी अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील २५ हजार ६४४ हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान सततच्या पावसामुळे झाली असल्याची माहिती अहवालानुसार शासनास सादर केली आहे.

अनुदान वाटपात सरकारची भेदभाव निती
जिथे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अशा मतदारसंघातील शेतक-यांना तोकडे अनुदान देऊन चेष्टा केली आहे. शेतक-यांवर झालेला हा शासनाचा अन्याय कदापीही खपवून घेतली जाणार नाही. यासाठी शासनाच्या या भेदभाव नीतीचा निषेध करून अनुदान वाटपात अन्याय करणा-या शासनाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहराध्यक्ष पप्पू शेख यांनी दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या