27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeलातूरमराठवाडा स्तरीय वादविवाद स्पर्धेत केशवराज विद्यालयाचे यश

मराठवाडा स्तरीय वादविवाद स्पर्धेत केशवराज विद्यालयाचे यश

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
उदगीर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वतीने आयोजित मराठवाडा स्तरीय लालबहादूर शास्त्री आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत लातुरच्या श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाने यश मिळवले. ‘शैक्षणिक स्पर्धा बालपण हिरावून घेत आहे / नाही’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली.यात केशवराजचा विद्यार्थी अपूर्व कुलकर्णी याने विषयाच्या अनुकूल बाजूने आणि संकेत केंद्रे याने विषयाच्या प्रतिकूल बाजूने विषय मांडणी केली.या स्पर्धेत अपूर्व कुलकर्णी याने शहरी मुलांच्या गटातून तृतीय क्रमांकाचे ३ हजार रुपये रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिक प्राप्त केले.संकेत केंद्रे यांने शहरी मुलांच्या गटातून पाचव्या क्रमांकाचे १ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मिळवले.

या यशस्वी विद्यार्थ्यांना वादविवाद स्पर्धा विभाग प्रमुख श्रीमती वनमाला कलुरे, ज्ञानोपासक मंडळ प्रमुख श्रीमती क्षमा कुलकर्णी,श्रीमती स्मिता मेहकरकर,नरेश इरलापल्ले, मन्मथ कासनाळे आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, उपाध्यक्ष जितेश चापसी, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, प्रवीण सरदेशमुख, संजय गुरव, नितीन शेट, धनंजय तुंगीकर, शैलेश कुलकर्णी, मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे, पर्यवेक्षक संदीप देशमुख, दिलीप चव्हाण,बबन गायकवाड, अंजली निर्मळे, क्षमा कुलकर्णी, वनमाला कलुरे, मेहकरकर, मन्मथ कासनाळे विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या