18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरयुपीएससी परीक्षेत विनायक महामूनी, नितिशा जगताप, निलेश गायकवाडचे यश; पालकमंत्री अमित देशमुख...

युपीएससी परीक्षेत विनायक महामूनी, नितिशा जगताप, निलेश गायकवाडचे यश; पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून अभिनंदन

एकमत ऑनलाईन

लातूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी परीक्षेत लातूरच्या विनायक प्रकाश महामूनी, नितिशा संजय जगताप, निलेश श्रीकांत गायकवाड यांनी उज्ज्वल यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल राज्याचे वैद्यकीय शिक्षक, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

विनायक महामुनी देशात ९५ व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. नितिशा जगताप हिने पहिल्याच प्रयत्नात देशात १९९ वा क्रमांक पटकावला आहे. निलेश श्रीकांत गायकवाड राष्ट्रीय पातळीवरुन ६२९ रँकने उत्तीर्ण झाला आहे. हे वृत्त मनस्वी आनंद देणारे आहे. शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या लातूरसाठी महामुनी, जगताप व गायकवाड यांचे उज्वल यश भूषणावह आहे. विनायक, नितिशा आणि निलेश यांच्या पालकांचे मन:पूर्वक अभिनंदन. तिच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, असे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नमुद केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या