लातूर : देशात साखर इंडस्ट्रीज मध्ये नावलौकिक असलेल्या लातूर येथील मांजरा साखर परिवारातील विलासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना, विलास साखर कारखाना युनिट १, युनिट २, रेणा साखर, जागृती शुगर, संत मारुती महाराज साखर कारखाना, ट्वेंटी वन शुगर युनिट १ व २ अशा एकूण आठ साखर कारखान्यानी चालु गळीत हंगामात मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये आमदार अमीत विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या सहकार्याने या हंगामात ५६.८० लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून राज्यात तिसरा व मराठवाडयात प्रथम क्रमांकावर उसाचे गाळप केले.
उस गाळपासाठी कारखान्याचे कर्मचारी, अधिकारी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्याबद्दल मांजरा साखर परिवारातील सर्व कर्मचा-यांचे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. या बैठकीस आमदार अमीत देशमुख यांच्यासह सर्व संचालक मंडळ यांची उपस्थिति होती. बुधवारी विलासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना प्रशासकीय कार्यालयात संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली त्यात हा निर्णय घेण्यात आला.
मांजरा साखर परिवारातील सर्व आठ साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, खाते प्रमूख, शेतकी अधिकारी, कामगार, कर्मचारी मजूर यांनी अतीशय प्रतिकूल परिस्थितीत यशस्वीपणे विक्रमी गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित करून परिवारातील सर्वच ८ साखर कारखान्याने उस उत्पादकांना एफआरपीसह रक्कम अदा केली आहे. त्यामुळे मांजरा साखर परिवारातील सर्व साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उस उत्पादक शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या बैठकीला आमदार तथा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे संचालक अमीत देशमुख, उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, संचालक मंडळ उपस्थित होते.