22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeलातूरम्युकरमायकॉसिसच्या ८१ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

म्युकरमायकॉसिसच्या ८१ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामध्ये म्युकरमायकॉसिस या आजारांच्या एकुण ४६२ रुग्णांची आजतागायत तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये कान, नाक, घसा विभागामध्ये आजपर्यंत एकुण ४४४ रुग्णांची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी म्युकरमायकॉसिस या आजाराच्या १०० रुगणांवर या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आला असुन सद्यस्थितीत ४६ रुग्ण कान, नाक, घसा विभागामध्ये दाखल आहेत. या आजाराची तपासणी केलेल्या रुग्णांपैकी ८१ रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.

तपासणी व उपचार करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ७२ रुग्णांना शुगर होती, ८२ रुग्णांना कोविड उपचारादरम्यान स्टेराईडचा वापर करण्यात आला होता व ७ रुग्णांना इतर अजार होते. आजपर्यंत ५५ रुग्णांवर (फक्शनल एन्डोस्कोपीक सायनस सर्जरी) नाकाच्या श्वास घेण्याच्या ठिकाणच्या हवेच्या पोकळया (सायनस) काढुन टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच ४४ रुग्णांवर (पार्टिनल मॅक्सीलेटरी) टाळुचा जबडा काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच २ रुग्णांवर (डायबरीडीमेट ऑफ वॉर्बिटा फयूलोर ) डोळयाच्या खालील हाडाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, असेही डॉक्टर देशमुख यांनी सांगितले.

तसेच आजतागायत १८ रुग्णांना डोळयाच्या पाठीमागे (रिटरोब्लबर इंजेक्शन एम्फोटेरिसीन-बी) देवुन रुग्णांच्या डोळयांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत व ६ रुग्णांमध्ये बुरशी बाधीत डोळा काढुन टाकण्यात आला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामधील म्युकरमॉयकोसिसची लागण झालेल्या एकुण १२ रुग्णांचा मृत्यु झाला असुन त्यापैकी ९ रुग्णांचा मृत्यु हा पोस्ट कोविड गुंतागुंतीच्या आजारामुळे झाला असुन ३ रुग्णांचा मेंदुमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मृत्यु झाल्याची माहिती डॉक्टर देशमुख यांनी दिली.

म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी म्हणजे हे एक फं गल इन्फेक्शन आहे. याचा संसर्ग सामान्यत: नाकातुन सुरु होतो व तो डब्ल्यूएक्सटीबीडब्ल्यूएक्सटीसी सायनस जबडा, डोळा व मेंदुपर्यंत पसरतो. कोविड झालेल्या रुग्णांमध्ये केवळ काही विशिष्ट परिस्थितीत म्युकरमायकोसिस होण्याचा धोका असतो. त्यामध्ये अनियंत्रित मधुमेह, स्टेराईडमुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, दीर्घकाळ अतिदक्षता विभागात अ‍ॅडमिट राहणे, अवयव प्रत्यारोपण झाल्यास किंवा कर्करोग झाल्यास बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना त्वरीत अ‍ॅडमिट करुन इंजेक्शन एम्फोटेरिसीन-बी हे शिरेमार्फत डॉक्टरांच्या निगराणीखाली देण्यात येते. हे इंजेक्शन साधारण दोन आठवड्यापर्यंत देण्यात येते. शस्त्रक्रियेद्वारे बुरशीची लागण झालेला भाग काढुन टाकण्यात येतो.

साधारणत: १५ दिवसानंतर औषधोपोचराने रुग्ण बरा होतो. दर पंधरा दिवसाला रुग्णांची एन्डोस्कोपी तपासणी करण्यात येते. काळ्या बुरशीचे निदान करण्यासाठी नाकातील खपलीची बायोप्सी करुन केओएच स्टॅनिंग केली जाते. लवकर निदान झालेल्या रुग्णांमध्ये उपचाराचे चांगले परिणाम दिसुन येत आहेत, असे डॉ. देशमुख यांनी म्हंटलं.

१३०६ इंजेक्शनचा वापर १६० इंजेक्शन उपलब्ध
म्युकरमायकॉसिस या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणारे इंजेक्शन एम्फोटेरिसीन-बी हे रुग्णसंख्येच्या आवश्यकतेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडुन नियमितपणे पुरवठा केला जातो. आजपर्यंत एकुण १३०६ इंजेक्शनचा वापर रुग्णांसाठी करण्यात आला असुन १६० इंजेक्शन हे सद्यस्थितीत या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत.

आजाराची लक्षणे दिसताच रुग्णांनी तपासणी करावी
काळया बुरशीची लक्षणे ही सामान्यत: नाक कोंडणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, तीव्र डोकेदुखी, गालदुखी, दात हलु लागणे व टाळुला जखम होणे अशी आहेत. ही लक्षणे दिसुन येताच रुग्णांनी तात्काळ कान, नाक, घसा विभागामध्ये तपासणी करुन घ्यावी असे आवाहन डॉ. सुधीर देशमुख, विभागप्रमुख कान, नाक, घसा डॉ. विनोंद कंदाकुरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे, विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र डॉ. शैलेंद्र चौहाण, विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. निलिमा देशपांडे, विभागप्रमुख दंतचिकित्सा डॉ. रितेश वाधवानी, सहयोगी प्राध्यापक नेत्रविभाग डॉ. नंदकुमार डोळे, डॉ. प्रदीप खोकले यांनी केले आहे.

इसापुर उजव्या कालव्याच्या पाण्यामुळे नुकसान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या