30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर साखर कारखान्यांनी मुल्यावर्धित उपपदार्थ निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा

साखर कारखान्यांनी मुल्यावर्धित उपपदार्थ निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा

एकमत ऑनलाईन

लातूर : साखर कारखान्यांनी आता फक्त साखर उत्पादनाच्या मर्यादेत न राहता मूल्यवर्धन करणा-या इथेनॉल, वीज, सीएनजी, कॉम्प्रेस बायोगॅस तसेच इतर केमिकल, वैद्यकीय औषधे व उपकरणे निर्मितीकडे लक्ष द्यावे, यातून शेतकरी व इतर घटकांना अधिकचे आर्थिक लाभ देऊन विकास प्रक्रिया गतिमान करावी, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख केले आहे.

वैशालीनगर निवळी येथील विलास सहकारी साखर कारखानाच्या अधीमंडळाची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यकंट बेद्रे, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, श्रीसंत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याचे गणपतराव बाजुळगे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, माऊली साखर कारखान्याचे चेअरमन व्ही. पी. पाटील, रेणा साखरचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, रेणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनंत देशमुख, विलास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, सोमवार दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी खेळीमेळीच्या वातावरणात कोवीडच्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन करीत पारी पडली.

या प्रसंगी पूढे बोलातांना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले की, साखर उत्पादन करुन ही कारखानदारी सक्षम ठरु शकत नाही. त्यामूळे बदलत्या काळाची गरज ओळखुन या व्यवसायात संशोधन आणि उपपदार्थ निर्मीतीवर भर देण्याची गरज आहे. अलीकडच्या काळात जवळपास सर्व साखर कारखाने इथेनॉल, मध्यार्क, विजनिर्तीतीचे प्रकल्प उभारले जात आहेत. या सोबतच आता सीएनजी, कॉम्पेस बायोगॅस, अल्कोहोल पासून इतर केमीकल्स औषधे व वैदयकीय उपकरणे निमीती, सौरउर्जा प्रकल्प सारख्या क्षेत्रात साखर कारखान्यांनी पूढकार घेणे गरजेचे आहे असे घडले तरच हे उदयोग पूढे टिकाणार असून शेतकरी, कर्मचारी, मजूर, कामगार यांनी अधिकचे लाभ मिळणार आहेत.
ग्रामीण विकासासाठी मांजरा परीवार कटीबध्द:

मांजरा कारखाना उभारुन आत चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत. या परीवारात एकाचे आठ कारखाने झााले आहेत त्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना मिळाली आहे. भविष्यात पूढील चाळीस वर्ष याच पध्दतीने विकास प्रकीया गतीमान राहील असे नियोजन करण्यात आलेले आहे. सहकार महषी्र दिलीपराव देशमुख यांचे हे नियोजन असल्यामुळे त्यात कोणताही बदल होवु शकत नाही याची जनतेलाही खात्री आहे असे त्यांनी योवळी सांगितले. ऊसशेती बरोबरच सेद्रींय शेतीच्या माध्यमातून धान्य, फळभाज्या ही पिके घेऊन शेतक-यांनी आपली अर्थिक स्थिती सुधारावी त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

या सभेत माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी कारखाना लि.चे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. आर. पवार यांनी विषय पत्रिकेतील २१ विषयांचे वाचन केले संचालक गोविंद डुरे यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. यानंतर व्हाईस चेअरमन रविंद्र काळे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन केले. यावेळी उपसभापती मनोज पाटील, अशोकराव काळे, विजय देशमुख, भारत आदमाने, सुभाष माने, संजीव माने, संभाजी रेड्डी यांच्यासह मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्याचे संचालक, पदाधिकारी, अधिकारी, सभासद, शेतकरी उपस्थित होते.

कारखान्याचे संचालक रणजीत पाटील, युवराज जाधव, गोविंद डुरे, अनंत बारबोले, सुर्यकांत सुडे, भैरवनाथ सवासे, अमृत जाधव, गोविंद बोराडे, कुसुमताई कदम, गुरुनाथ गवळी, रामदास राऊत, बाळासाहेब बिडवे, सुभाष माने, नारायण पाटील, भारत आदमाने, अमर मोरे, संजय पाटील खंडापुरकर, अनिल पाटील, दगडूसाहेब (ज्ञानोबा) पडीले यांनी सर्वाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहूल इंगळे यांनी तर आभार संचालक युवराज जाधव यांनी मानले.

२०५० पर्यंतचे पाण्याचे नियोजन आवश्यक
ऊसशेतीसाठी जास्तीचे पाणी लागते हा अपप्रचार आहे, असे सांगून काटकसरीने व सुक्ष्म सिंचनाचा वापर करुन एकरी अधिकचे उत्पन्न्­ घेण्यासाठी शेतकरी वर्ग आता प्रयत्न करीत आहेत. ऊस हे ऐकमेव हमकास उत्पन्न देणारे पिक असल्यामूळे ते घेण्या पासून कोणालही रोखता येत नाही. या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचेही वेगळे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सन २०५० पर्यंतचा विचार करुन उजणी धरणातून धनेगाव धरणात पाईपलाईनदवारे पाणी आण्ण्याचे नियोजन सुरु आहे, असे पालकमंत्री श्री देशमुख म्हणाले.

शेतक-यांना दिवसाची वीज देण्याचा प्रयत्न
शेतक-यांना रात्री ऐवजी दिवसाची वीज मिळावी त्याच बरोबर वीजबील भरण्याबाबत सवलत मिळावी बील भरले नाही म्हणून वीज पूरवठा खंडीत केला जाऊ नये, अशी विनंती शेतकरी बांधवाकडून होत आहे या संदर्भाने आपण ताताडीने ऊर्जा मंत्री यांची तातडीने भेट घेणार आहोत. या तिन्ही विषयातून काय मार्ग काढता येतो ते तपासले जाईल आणि योतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले. शेतक-यांच्या मागण्याच्या संदर्भाने काँग्रेस पक्ष कायम सकारात्मक राहीला आहे यामूळे भविष्यात त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी १०१ अर्ज दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या