लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मांजरा साखर परिवाराने ऊस उत्पादक शेतक-यांना न्याय देत विक्रमी गाळप करुन मोठी मदत आम्हा शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. त्याबद्दल लातूर जिल्हा ऊस उत्पादक शेतक-यांच्या वतीने ऊस उत्पादक शेतकरी मेळावा व मांजरा साखर परिवारातील माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांचा गौरव सोहळा दि. २६ मे रोजी आयोजित केला होता. परंतू, सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे हा कार्यक्रम तुर्त पुढे ढकलण्यात आला असून १० जुननंतर हा कार्यक्रम होणाार असल्याची माहिती लातूर जिल्हा ऊस उत्पादक शेतक-यांच्या वतीने देण्यात आली.
सध्या लग्नसराईमुळे या आठवड्यात मोठया प्रमाणावर विवाह सोहळे असल्याने अनेक शेतकरी बांधव यांनी संयोजन समितीकडे कार्यक्रम वेळ व तारीख पुढे ढकलावी, अशी विनंती केली होती त्यांच्या विनंतीला मान देवुन उस उत्पादक शेतकरी मेळावा गौरव सोहळा १० जूननंतर घेण्यात येणार असून लवकरच या सोहळ्याची तारीख आपणास कळवण्यात येईल. यासाठी सर्व उस उत्पादक शेतकरी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकरी मेळावा गौरव संयोजन समितीचे सदस्य राजेंद्र मोरे, सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी, नवनाथ शिंदे, राजीव कसबे, अशोक दहिफळे, काकासाहेब जाधव, हिराचंद जाधव, बंडू माळी, दगडु बरडे, अनंत पाटील, शाम जाधव यांनी केले आहे.